32 C
Mumbai
Wednesday, June 26, 2024
Homeमहाराष्ट्रDawood Ibrahim : गँगस्टर दाऊद इब्राहिमसह त्याची पत्नीही कोरोनाबाधित

Dawood Ibrahim : गँगस्टर दाऊद इब्राहिमसह त्याची पत्नीही कोरोनाबाधित

टीम लय भारी

कराची : १९९३ साली मुंबईत झालेल्या भीषण बॉम्बस्फोट मालिका प्रकरणामध्ये फरार असलेला कुप्रसिद्ध गुंड दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) आणि त्याच्या पत्नीला कोरोनाचा (Coronavirus) संसर्ग झाल्याचे वृत्त सीएनएनने दिले आहे. पाकिस्तानमधील सरकारी अधिका-यांच्या हवाल्याने हे सांगण्यात आले आहे.

पाकिस्तानमधील गुप्तचर यंत्रणेचे अधिकारी दाऊदला (Dawood Ibrahim) कोरोना झाल्यामुळे संभ्रमात पडले असून दाऊदला कराचीमधील लष्कराच्या रुग्णालयात भरती करण्यात आल्याचे समजते. दाऊद आणि त्याच्या पत्नीची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांच्या घरातील सुरक्षारक्षक आणि कर्मचा-यांना क्वारंटाइन करण्यात आल्याचा दावा सुत्रांच्या हवाल्याने करण्यात आला आहे.

पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड झाला

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा सध्या पाकिस्तानात नसल्याची माहिती ब्रिटनमधील एका न्यायालयाला मागील वर्षी पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाने दिली होती. मात्र आता दाऊदला कोरोना झाला असून त्याच्यावर कराचीमधील लष्करी रुग्णालयामध्येच उपचार सुरु असल्याचे सीएनएनचे म्हणणे आहे. मागील अनेक वर्षांपासून दाऊदला आम्ही आश्रय दिला नाही असे पाकिस्तान सांगत असतानाच आता त्याला कोरोनाचा संसर्ग झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड झाला आहे.

दहा दिवसांपूर्वीच दाऊद लष्कर ए तोयबाच्या काही लोकांना भेटल्याचेही या वृत्तामध्ये नमूद करण्यात आले आहे. तो काही दिवसांपूर्वीच इस्लामाबादमधून कराचीमध्ये आल्याचे सांगण्यात येत आहेत. त्यामुळे आता दाऊदच कोरोना पॉझिटीव्ह असल्याची माहिती समोर येत असल्याने मागील काही दिवसांमध्ये तो ज्या ज्या व्यक्तींना भेटला आहे त्यांची तपासणी करावी लागणार असल्याचे वृत्तवाहिनीने म्हटले आहे. असे झाल्यास जगभरामध्ये मोस्ट वॉण्टेड असणा-या दाऊदला पाकिस्ताननेच मागील २५ वर्षांपासून अधिक काळ आसरा दिल्याचे उघड होईल, असे सांगण्यात येत आहे.

पाकिस्तानची गोची

दाऊदला कोरोनाचा झाल्याचे वृत्त समोर आल्यानंतर आता पाकिस्तानने या वृत्ताला दुजोरा दिल्यास त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा विरोध सहन करावा लागणार आहे. दाऊदला भेटलेल्या व्यक्तींचे कोरोना चाचणीचे निकाल सकारात्मक आले तर पाकिस्तान मोठ्या अडचणीत सापडण्याची शक्यत आहे. असे झाल्यास पाकिस्तानला दाऊद आणि त्याची पत्नी कराचीमध्ये उपचार घेत असल्याचे सांगावे लागेल. त्यानंतर राजकीय दबाव वापरुन दाऊदला ताब्यात घेण्यासंदर्भात भारत हालचाली सुरु करु शकतो, असे सांगण्यात येत आहे.

भारताने मागील अनेक वर्षांपासून दाऊद पाकिस्तानमध्येच असल्याचे म्हटले होते. तसेच यासंदर्भात पाकिस्तानने चौकशी करुन दाऊदला भारताच्या ताब्यात देण्याच्या मागण्याही अनेकदा करण्यात आल्या होत्या. मात्र प्रत्येक वेळेस पाकिस्तानने दाऊद पाकिस्तानमध्ये नाही असे सांगत त्याची पाठराखण केली होती. मात्र आता कोरोनामुळे पाकिस्तानचे पितळ उघडे पडले आहे. दाऊद हा कराचीमधील एका उच्चभ्रू वस्तीत राहत असून येथे पाकिस्तानी सुरक्षा दलाशी संबंधित अधिकारी आणि आयएसआयचे अधिकारी राहतात. त्यामुळेच आता दाऊदला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आल्याने पाकिस्तान यासंदर्भात काय स्पष्टीकरण देते हे येणा-या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी