29 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रखिल्लार जातीच्या बैलाची जात नामशेष होण्याच्या मार्गावर

खिल्लार जातीच्या बैलाची जात नामशेष होण्याच्या मार्गावर

 

टीम लय भारी
मुंबई : बैलांच्या शर्यतींवर कायद्याने बंदी असताना सुद्धा गोपीचंद पडळकरांनी खेळाला परवानगी दिली आहे. याचे कारण सदाभाऊ खोत यांनी टीम लय भारीशी बोलताना स्पष्ट केले आहे (gopichand padalkar allowed bollock cart racing evenafter goverment banned it by law).

 

केंद्र सरकारने बैल सिंह इत्यादी प्राण्यांच्या शर्यतींवर बंदी घातली आहे. याच्या मागचा हेतू हिंस्त्र प्राण्यांचा वापर करून हिंसेला प्रोत्साहन न देणे इतका शुद्ध आहे. जानेवारी २०१६ मध्ये नवे नियम लागू करण्यात आले. आणि परत २०१७ साली या बाबतीतले काही नियम शिथिल करण्यात आले. बैलाच्या शर्यती अधिकृत झाल्या मात्र पेटाने या निर्णयाला स्थगिती दिली. बैल हा पाळीव प्राणी आहे त्याच्यामुळे कोणतीही हिंसा होत नाही असे मत यावेळी सदाभाऊ खोतांनी व्यक्त केले.

Gopichand Padalkar : ‘तुम्हाला शरद पवारांचा पंटर, खबर्‍या अन् चमचा म्हणू शकतो पण…’ पडळकरांचे संजय राऊतांना खरमरीत पत्र

5 ट्रिलियन अर्थव्यवस्था हे फक्त एक स्वप्नच, सीतारामण यांच्यामुळे देशावर महागाईचे ओझे

gopichand padalkar
सदाभाऊ खोत

गावकऱ्यांचा पारंपरिक खेळ असलेल्या बैलांच्या शर्यती बंदच होत्या. बैल शेतातून धावतो तेव्हा पिकाचं अतोनात नुकसान होत, परंतु शेतकऱ्याच्या मानण्याप्रमाणे बैल त्यादिवशी देवाच्या रूपात धावतो यामुळे शेतकऱ्याला आपल्या देवाचे कौतुकच वाटते. पूर्वापारपासून चालत आलेली शेतकऱ्यांची हि परंपरा मोडू नये म्हणून गोपीचंद पाडळकरांनी शर्यती व्हाव्यात अशी परवानगी दिली.

या शर्यतींसाठी वापरण्यात येणारे बैल हे खिल्लार जातीचे असतात. हि जात शर्यतींसाठीच प्रसिद्ध आहे. हि जात दूध देत नाही. या जातीचे बैल औताला जुंपत येत नाहीत. अत्यंत शक्तिशाली अशी हि जात उपयोग न झाल्यास संपुष्टात येईल आणि काही वर्षांनी या जातीचं अस्तित्व नामशेष होईल. अशी भीती वाटल्यामुळे पडळकरांनी शर्यतींना परवानगी दिली असल्याचे सदाभाऊ खोत यांनी सांगितले.

रोहित पवारांकडून निर्मला सीतारामण यांना वाढदिवसाच्या खोचक शुभेच्छा !

‘Farmers attending, not Taliban’, says BJP leader over police presence to prevent banned Sangli bullock cart race

या काही गोष्टी सरकारला एका जागी बसून समजत नाहीत त्यासाठी शेतकऱ्यांत वावरावं लागतं, शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही पहिले आहेत परंतु ते सरकारपर्यंत पोहोचवणार कोण हा प्रश्न उरतोच. म्हणून आम्ही सरकारला शिकवतो आहोत. बंदी असतानासुद्धा शर्यतींना परवानगी दिल्याने शेतकऱ्यांचे म्हणणे सरकारपर्यंत पोहोचू शकेल अशा आशयाचे उद्गार सदाभाऊ खोत यांनी काढले.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी