28 C
Mumbai
Monday, June 17, 2024
Homeमहाराष्ट्रबनावट सोने खरे भासवून साडेआठ लाखांचा गंडा

बनावट सोने खरे भासवून साडेआठ लाखांचा गंडा

 लयभारी न्यूज नेटवर्क

अहमदनगर : सोनाराशी संगनमत करून बनावट सोने खरे असल्याचे दाखवून सोनेतारण कर्ज घेऊन धर्मात्मा पतसंस्थेची सुमारे आठ लाख सव्वीस हजार रूपयांची फसवणूक केली. या प्रकरणी नऊ जणांविरोधात अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड पोलिस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याप्रकरणी जामखेड पोलिसांनी पाच जणांच्या मुसक्या आवळत अटक केली. अटकेतील पाच आरोपीत एका शिक्षकाचा व एका महिलेचा समावेश आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. संपूर्ण परिसरात या बनवाबनवीचीच चर्चा सुरु आहे. इतर ठिकाणीही असा प्रकार घडला का याचाही तपास लावण्यात येणार आहे.

पोलिस सुत्रांकडून समजलेली माहिती अशी की, अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड शहरातील धर्मात्मा मल्टिस्टेट क्रेक्रिट सोसायटीच्या शाखेतून 16/3/2017 ते 05/06 /2018 या काळात देण्यात आलेल्या सोनेतारण कर्जाची वसुली होत नसल्याने पतसंस्थेच्या शेवगाव येथील मुख्यालयात 06/08/2019 रोजी जामखेड शाखेत ठेवलेल्या सोन्याचा जाहिर लिलाव करण्यात आला. या लिलावात सोने मुल्यमापकास हाताशी धरून जामखेड तालुक्यातील आठ खातेदारांनी बनावट सोने खरे असल्याचे दाखवून सोनेतारण कर्ज उचलून पतसंस्थेची फसवणूक केल्याचे निदर्शनास आले होते.
दरम्यान, या प्रकरणी तब्बल तीन महिन्यानंतर शेवगाव येथील धर्मात्मा पतसंस्थेचे मुख्य व्यवस्थापक नंदकिशोर झिरपे (रा कोळगाव ता शेवगाव) यांच्या फिर्यादीवरून सोने मुल्यमापक संजय शंकर महामुनी, सुनिल मच्छिंद्र कोळपकर, भाऊसाहेब मारूती पवार, राजू गोविंद पवार, कानिफनाथ ऊर्फ दत्ता गहिनीनाथ मोहळकर (सर्व रा नान्नज ता जामखेड) संतोष बाळासाहेब पाटील ( राळेभात गल्ली जामखेड )रामदास लक्ष्मण मानमोडे( वहाली – सावरगाव घाट ता पाटोदा जि बीड ) सुरेखा, कैलास सुरवसे (लेहनेवाडी ता जामखेड) मुमताज इब्राहिम मनियार (शिक्षक काॅलनी जामखेड) या नऊ जणांविरोधात बुधवारी रात्री उशिरा कलम 420,467, 468, 471, 409 ,34 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान गुन्हे दाखल होताच जामखेड पोलिसांनी या प्रकरणातील सोने मुल्यमापक संजय शंकर महामुनी, भाऊसाहेब मारूती पवार, राजू गोविंद पवार, कानिफनाथ ऊर्फ दत्ता गहिनीनाथ मोहळकर या चार जणांना जामखेड तालुक्यातील नान्नज येथून गुरूवारी ताब्यात घेत अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपींपैकी कानिफनाथ ऊर्फ दत्ता मोहळकर हा आरोपी नान्नज येथील नंदादेवी ज्युनिअर काॅलेजमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान या प्रकरणात गुरूवारी सायंकाळी आणखीन एका महिला आरोपीला जामखेड पोलिसांनी अटक केली आहे. इतर चार आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांचे पथक आरोपींच्या मागावर असल्याची माहिती तपासी अधिकारी तथा पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी यावेळी बोलताना दिली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी