35 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमुंबईइथे आता २ हजारांची नोट चालणार नाही

इथे आता २ हजारांची नोट चालणार नाही

रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने काही महिन्यापूर्वी २ हजार रुपयांची नोट येत्या काळात चालणार नाही असे सूचित केले होते. त्यामुळे अनेकांनी बँकेत जावून आपल्याकडच्या नोटा बदलून घेतल्या होत्या. पण एक ठिकाणी या नोटा चालायच्या. पण आता तिथेही या नोटा चालणे बंद करण्यात आले आहे.

२ हजारच्या नोटेसंदर्भात रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने काही दिवसांपुर्वी महत्वाचे निर्देश दिले होते. त्यानुसार अनेकांनी चलनातील 2000 रुपयांच्या नोटा बँकेत जमा केल्या. पण काही लोक असेही आहेत त्यांनी नोटा बॅंकेत जमा करण्याऐवजी ई-कॉमर्स वेबसाइटवरून कॅश ऑन डिलिव्हरी (सीओडी) ऑर्डर केल्यावर वापरल्या. २००० रुपयांच्या नोटा चलनात बाद करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली होती. त्यावेळी ई-कॉमर्स वेबसाइट Amazon ने कॅश ऑन डिलिव्हरीच्या वेळी २००० रुपयांच्या नोटा स्वीकारण्याची घोषणा केली होती. पण आता याबद्दल नवीन माहिती देण्यात आली आहे.

आता तुम्ही अमेझॉनवरून कॅश ऑन डिलिव्हरी (COD) ऑर्डरसाठी २ हजारची नोट देण्याचा प्रयत्न केलात तर ती स्वीकारली जाणार नाही. २ रुपयांच्या नोटा स्वीकारण्याची शेवटची तारीख १९ सप्टेंबर असल्याचे अमेझॉनने सांगितले आहे. म्हणजेच आता तुम्ही अमेझॉनवर कोणतीही वस्तू ऑर्डर केलीत तर आता अमेझॉन तुमच्याकडून २००० रुपयांच्या नोटा स्वीकारणार नाही. कंपनीने आपल्या वेबसाईटवर दिलेल्या एफएक्यूमध्येही याबाबत माहिती दिली आहे.

गेल्या ३-३.५ वर्षापासून २ हजाराची एकही नोट छापण्यात आलेली नाही. यामुळे सर्कुलेशन हळू हळू कमी होत गेले. सध्या बाजारातील व्यवहारांमध्ये ही नोट नाहीच असं मानावं लागेल. नोव्हेंबर २०२२ मध्ये एका वृत्त संस्थेने  माहितीच्या अधिकारात यासंबधी माहिती मागवली होती. यामध्ये स्पष्ट झाले की, नोटेची छपाई गेल्या तीन वर्षापासून करण्यात आलेली नाही, असे संसदेच्या बजेट सत्रादरम्यान अर्थमंत्र्यांनी नोट व्यवहारात न दिसण्याबाबत लेखी उत्तर दिले होते.
हे सुद्धा वाचा
अजित पवार यांची मोठी शोकांतिका : पाचवेळा उपमुख्यमंत्री होऊनही मुख्यमंत्री पदाला हुलकावणी
इतिहास शेतीचा
लोकसभा, विधानसभेत आता महिलांना मिळणार 33% आरक्षण

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालानुसार मार्च २०१७ च्या शेवटी आणि मार्च २०२२ च्या शेवटापर्यंत ५०० आणि २००० मूल्याच्या बँक नोटांचे एकूण मूल्य ९.५१२लाख कोटी आणि २७.०५७ लाख कोटी होती. अर्थमंत्र्यांनी हे देखील सांगितले की, आरबीआयच्या वार्षिक अहवालानुसार २०१९-२०२० नंतर दोन हजाराच्या नोटांची छपाई झालेली नाही. असे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी