29 C
Mumbai
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्ररायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीवर दरड कोसळून 10 जणांचा मृत्यू , प्रशासनाकडून मदतकार्य सुरू

रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडीवर दरड कोसळून 10 जणांचा मृत्यू , प्रशासनाकडून मदतकार्य सुरू

रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील इर्शाळगड वाडीवर दरड कोसळण्याची घटना काल मध्यरात्री घडली. रात्री झोपेत असताना अनेकांवर कालाने हल्ला केला. ही दरड बुधवारी रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास दरड कोसळली. या घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्यात 120 हून अधिक लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मध्यरात्री झालेल्या अपघातानंतर बचावकार्य सुरू असून आतापर्यंत पाच ते सहा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तसेच, एकूण 98 जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. यामध्ये दोन ते तीन लहान मुलांचाही समावेश आहे.

या ठिकाणी अनेक बचाव पथके काम करत आहेत. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून इतर अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात येत आहे. दुसरीकडे, अपघाताबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हेलिकॉप्टरच्या सहाय्याने बचाव कार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्राथमिक माहितीनुसार गावातील 90% भाग ढिगाऱ्याखाली गाडला गेला आहे. येथे 50 ते 60 आदिवासींच्या घरांची मोठी वस्ती होती. या अपघातात मोठी जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त होत आहे. आतापर्यंत बचाव पथकाला एक महिला आणि दोन मुलांना वाचवण्यात यश आले आहे.

हे सुद्धा वाचा:

सुप्रिया सुळेंना मुलगी रेवतीबद्दल प्राऊड फिलींग !

चार महिन्यांचे लेकरु डोळ्यासमोर वाहून गेलं; आईने फोडला हंबडरडा

तीस्ता सेटलवाड यांना नियमीत जामीन; गुजरात उच्च न्यायालयाबद्दल काय म्हणाले सुप्रीम कोर्ट?

जोरदार वाऱ्यामुळे काही दगड अजूनही वरून खाली येत आहेत. त्यामुळे बचाव पथकासाठीही धोका निर्माण झाला आहे. मात्र अडकलेल्यांना तातडीने बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. इर्शाळगडाजवळ रेक्स्यू ऑपरेशन सुरू आहे. गावापर्यंत पोहोचण्याचा रस्ता बंद असून वाहने जात नाहीत. अर्धा तास पायी चालत जावे लागत आहे. या घटनास्थळी जात असतानाच एका अग्निशमन दलाच्या जवानाचा दम लागून मृत्यू झाला आहे. तर दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत आणि जखमींचा सर्व खर्च सरकार करणार आहे असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. ईशाळवाडी दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीसाठी हेल्पलाईन सुरू केली आहे. 8108195554 क्रमांकावर संपर्क करण्याचे अवाहन केले आहे. दरम्यान, पालकमंत्री उदय सामंत, दादा भुसे, गिरीश महाजन, उपजिल्हाधिकारी दत्तात्रय नवले आणि सर्जेराव सोनावणे हे घटानास्थळी पोहोचले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी