29 C
Mumbai
Monday, July 1, 2024
Homeमहाराष्ट्रपंतप्रधान मोदींनी 'त्या'भाषणात मजुरांबद्दल चकार शब्द नाही काढला – जावेद अख्तर

पंतप्रधान मोदींनी ‘त्या’भाषणात मजुरांबद्दल चकार शब्द नाही काढला – जावेद अख्तर

लय भारी टीम

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ३३ मिनिटांच्या भाषणामध्ये पंतप्रधानांनी देशातील स्थलांतरित मजुरांच्या समस्येसंदर्भात एक शब्दही उच्चारला नाही. असा टोला  प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी ट्विटवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

पंतप्रधान मोदींनी मंगळवारी देशाला संबोधित करताना देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी आर्थिक मदतीची घोषणा केली. मात्र त्याचबरोबर त्यांनी लॉकडाउन चारमध्ये नियम पहिल्या तीन लॉकडाउनपेक्षा वेगळे असतील असंही स्पष्ट केलं. मोदींनी आपल्या ३३ मिनिटांच्या भाषणामध्ये आर्थिक दृष्ट्या भारताने आत्मनिर्भर होण्याची गरज असल्याचे मत मांडले. मोदींच्या या भाषणाबद्दल अख्तर यांनी ट्विटवरुन टीका केली आहे.

काय म्हणाले गीतकार जावेद अख्तर…

“२० लाख कोटींच्या आर्थिक मदतीमुळे देशाचे मनोधैर्य नक्कीच वाढले. मात्र ३३ मिनिटांच्या या भाषणामध्ये ज्या लाखो प्रवासी मजुरांना त्यांचे अस्तित्व टीकवण्यासाठी तात्काळ मदतीची गरज आहे त्या मजुरांना होत असणाऱ्या त्रासाबद्दल एक शब्दही नव्हता. हे चुकीचे आहे,” असं अख्तर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

 

 

 

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी