29 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeटॉप न्यूजमहागाईत अजून भर पडणार, एप्रिलपासून सिलेंडरच्या किंमतीत होणार वाढ

महागाईत अजून भर पडणार, एप्रिलपासून सिलेंडरच्या किंमतीत होणार वाढ

टीम लय भारी

मुंबई : जगभरात महागाई वाढताना दिसत आहे. मात्र जगभरातील गॅस संकटाचा परिणाम बघता भारतात एप्रिलपासून सिलेंडरच्या किंमतीत वाढ होताना दिसू शकते. कारण एप्रिलमध्ये सरकार नैसर्गिक वायूच्या देशांतर्गत किमतीत सुधारणा करते. त्यामुळे घरगुती गॅसचे दर वाढतील, असे विश्लेषकांनी मत मांडले आहे(Inflation will continue to rise, with cylinder prices rising from April).

सर्वसामान्य जनता आधीच महागाईला त्रस्त व ग्रस्त आहे. आता पुन्हा एकदा जनतेला महागाईचा मोठा फटक बसण्याची शक्यता आहे. स्वयंपाक करण्यापासून वाहन चालविणे देखील महागात पडणार आहे. सध्या जगभरात गॅसची मोठी टंचाई निर्माण झाली आहे आणि त्याचा परिणाम आता भारतातही जाणवू लागला आहे. या पार्श्वभूमीवर १ एप्रिल २०२२ पासून घरगुती गॅसच्या किमती दुप्पट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ईकॉनॉमिक टाइम्सने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.

ईटीच्या अहवालानुसार, घरगुती गॅसच्या किमतींव्यतिरिक्त गॅस संकटाचा परिणाम कारच्या सीएनजी, पीएनजीवर देखील दिसू शकतो. याचेही दर वाढण्याची शक्यता आहे. एवढेच नाही, तर विजेचे दरही वाढतील असे या वृत्तात म्हंटले गेले होते. (फर्टिलायझर सब्सिडी) बिलातही वाढ होणार आहे.

हे सुद्धा वाचा

शिवाजी पार्कमध्ये मनसे विरुद्ध शिवसेना… शिवाजी पार्कचे नुतनीकरण सुरू असताना वादाला सुरुवात!

100 कोटी वीजबिल माफीसाठी चेंबूरच्या रहिवाशांचा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जनआक्रोश मोर्चा

A new measure of inflation is brewing on the horizon

कोरोना या जागतिक महामारीमुळे ऊर्जेच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे, पण पुरवठ्याच्या बाबतीत कमतरता दिसून येत असल्याने याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे. आणि याचा जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे.

एप्रिलमध्ये नवे दर लागू होण्याची शक्यता अशी की, घरगुती नैसर्गिक वायूच्या किमती दरवर्षी एप्रिल आणि ऑक्टोबरमध्ये निश्चित केल्या जातात व किमती ठरवल्या जातात.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी