29.5 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeराष्ट्रीयभारतातील 'या' राज्यात राहणाऱ्या नागरिकांना मिळाले दोन देशाचे नागरिकत्व

भारतातील ‘या’ राज्यात राहणाऱ्या नागरिकांना मिळाले दोन देशाचे नागरिकत्व

टीम लय भारी 

भारतात असे एक राज्य वसलेले आहे की, तिथल्या स्थानिक नागरिकांना दोन देशातील नागरिकत्व मिळाले आहे. आर्चय वाटलना, पण हे सत्य आहे. भारत आणि म्यानमारच्या सीमेवर वसलेले हे राज्य ज्याला भारत देशाचे स्विझरलँड असेसुद्धा म्हटले जाते. ते म्हणजे नागालँड (Unique Village In Nagaland)

नागालँड राज्याचा इतिहास

नागालँड भारताच्या उत्तर-पूर्व ब्रह्मपुत्र घाटामध्ये आणि बर्मा च्या सुंदर पर्वतामध्ये वसलेले लहान राज्य आहे. ज्याची संस्कुती, परंपरा इतर देशांच्या तुलनेने पुर्णता भिन्न आणि वेगळ्या आहेत. नागालँड च्या उत्तरेला अरुणाचल प्रदेश, पश्चिमेला आसाम, दक्षिणेला मनिपुर आणि पूर्वेला म्यानमार आहे. नागालँड 1961 पूर्वी नागा हिल्स या नावाने ओळखले जात होते. परंतु 1 डिसेंबर 1963 रोजी भारत सरकार द्वारे नागालँडला (Unique Village In Nagaland) पूर्ण राज्याचा दर्जा देण्यात आला. राज्यात असे एक गाव आहे त्या गावातील भौगिलिक रचनेमुळे तिथल्या नागरिकांना भारत व म्यानमार देशाचे नागरिकत्व मिळाले आहे.

लोंगवा गावातील आश्चर्य

नागालँड मध्ये लोंगवा गाव (Unique Village In Nagaland) आहे. जे मोन जिल्ह्यातील सर्वात मोठ्या गाव आहे. राज्यातील उत्तरी भागात असलेल्या या गावातून भारत – म्यानमार सीमा रेषा जाते. त्यामुळे भारत असो वा म्यानमार या दोन्ही देशात या गावातील लोकं मुक्तपणे संचार करु शकतात. विशेष म्हणजे गावातील सरपंचाच्या घरातूनच सीमा गेली आहे. त्यामुळे सरपंचाचे घर दोन भागात विभागले आहे. एक भारतात आणि दुसरं म्यानमारमध्ये. गावकऱ्यांना (Unique Village In Nagaland) देशाची सीमा ओलांडण्यासाठी कुठल्याही व्हिसाची आवश्यकता नसते. या गावातील गावकरी दोन्ही देशात फिरत असतात. कदाचित हे ऐकून तुम्ही थक्क व्हाल या गावातील काही घरातील स्वयंपाकघर हे भारतात तर घरासमोरील अंगण म्यानमारमध्ये आहेत.

निसर्गत: परिपूर्ण असलेले राज्य

म्यानमारच्या जवळ लोंगवा (Unique Village In Nagaland) गावातील लोकं कोन्याक जनजातीचे आहेत. ज्यांना हेडहंटर म्हणून ओळखलं जातं. १९६० च्या दशकात गावात शिकार करण्याची लोकप्रिय परंपरा होती. गावातील अनेक लोकांकडे पितळेच्या खोपडीनं बनलेले हार आहेत. ज्याला युद्धाच्या विजयाचं प्रतिक मानलं जातं. पूर्वोत्तर भारतात फिरण्यासाठी सर्वात चांगली जागा तिच आहे. लोंगवा इथं शांत वातावरण आणि याठिकाणी हिरवळ लोकांचं मन जिंकते. नैसर्गिक सुंदरतेसोबतच लोंगवामध्ये नागालँड सायन्स सेंटर, डोयांग नदी, शिलोई सरोवर, हांगकांग मार्केट यासारखे अन्य पर्यटनस्थळ आहेत. लोंगवा (Unique Village In Nagaland) नागालँडच्या मोन जिल्ह्यातील घनदाट जंगलातील म्यानमार सीमे लगतच असलेले भारताचं अखेरचं गाव.

हे सुध्दा वाचा :

Meet Nagaland’s first woman MP S Phangnon Konyak

अखेर ईडीची संजय राऊतांच्या घरी धाड, मुंबई आणि अलिबागमधील मालमत्तात जप्त

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी