30 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
Homeमहाराष्ट्रकोकणबारामतीबाबत मोठा निर्णय; अजित पवार गटाच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

बारामतीबाबत मोठा निर्णय; अजित पवार गटाच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

अजित पवार (Ajit Pawar) गटाचा पहिला उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. तसेच झालेल्या बैठकीमध्ये बारामती लोकसभा (Baramati lok sabha) संदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला. मात्र, उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम आहे. लोकसभा निवडणुकांच्या (Lok sabha election) पार्श्वभूमीवर अजित पवार गटाने बैठकीनंतर आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी अनेक जागांबाबत चर्चा झाली.

अजित पवार (Ajit Pawar) गटाचा पहिला उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. तसेच झालेल्या बैठकीमध्ये बारामती लोकसभा (Baramati lok sabha) संदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला. मात्र, उमेदवारीबाबत सस्पेन्स कायम आहे. लोकसभा निवडणुकांच्या (Lok sabha election) पार्श्वभूमीवर अजित पवार गटाने बैठकीनंतर आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी अनेक जागांबाबत चर्चा झाली. (ajit pawar group announced first candidat and big statement in baramati Lok Sabha Election 2024)

पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसची आज बैठक झाली. या बैठकीत रायगडमधून सुनील तटकरे यांना अजित पवार यांनी उमेदवारी घोषित केली. यासंदर्भात अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. येत्या 28 तारखेला महायुतीचा संपूर्ण फॉर्म्युला जाहीर केला जाईल असंही अजित पवारांनी यावेळी सांगितलं.

बैठकीत नेमकं काय घडलं?

अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात राष्ट्रवादी गटाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये बारामती, शिरूर, सातारा ,धाराशिव, नाशिक, रायगड परभणी लोकसभा संदर्भात चर्चा झाली. तसेच, परभणीचा उमेदवार दोन दिवसांत ठरणार असल्याचे समजलं. या बैठकीत बारामती लोकसभेची जागा महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसचच लढवणार, असल्याचा ठराव एकमतानं मंजूर करण्यात आला.

परभणीचा उमेदवार दोन दिवसांत ठरणार असून महादेव जानकरांना पाठिंबा ही केवळ अफवा असून विरोधकानी पसरवली असल्याची माहिती सुनील तटकरेंनी दिली.

अजित पवार काय म्हणाले?

एकत्रित चर्चा करुन महायुतीत जागावाटपाचे 99 टक्के काम झाले. मात्र 28 तारखेला मुंबईत देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि मी पत्रकार परिषद घेऊन उमेदवार जाहीर करणार आहे. रायगडमधून सुनील तटकरे निवडणूक लढविणार आहेत. शिवाजीराव आढळराव पाटील 20 वर्षांपूर्वी आमच्या पक्षातून शिवसेनेत गेले होते. ते आमचे शिरुरचे उमेदवार असणार आहेत. इतर उमेदवारांची नावे 28 तारखेला जाहीर करण्यात येतील.

तसेच यावेळी बोलताना अजित पवार यांनी माध्यमांनादेखील झापलं. कारण नसताना पत्रकारांनी राष्ट्रवादीला तीन – किंवा चारच जागा लढविण्यास मिळणार अशा खोट्या बातम्या चालवल्या. असं वक्तव्य करत पवारांनी माध्यमांवर नाराजी व्यक्त केली.

तसेच, प्रत्येक मंत्र्यावर एका लोकसभा मतदारसंघाची तर प्रत्येक आमदारावर एका विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी असेल. नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचे आहे. बारामतीचा उमेदवार 28 तारखेला जाहीर करतो. तुमच्या मनातील उमेदवार जो उमेदवार आहे, तोच आमचा उमेदवार असेल. अस पवार यावेळी म्हणाले.

यासोबतच, सातारची जागा अजून जाहीर झालेली नाही. उदयनराजेंना सांगण्याचे काम भाजपचे नेते करतील असं सांगत विजय शिवतारेंबद्दल बोलण्याचे अजित पवारांनी टाळलं.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी