31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रलोकनेता शाहीर साबळे यांची शंभरी!

लोकनेता शाहीर साबळे यांची शंभरी!

‘जय जय गर्जा महाराष्ट्र माझा’ या पोवाड्याद्वारे संपूर्ण देश पिंजून काढणाऱ्या ख्यातनाम लोकनाट्य कलाकार शाहीर साबळे यांची नुकतीच जन्मशताब्दी झाली. आपल्या पोवाड्यातून समाजपरिवर्तन घडवणाऱ्या शाहीर साबळे यांचा पुरोगामी महाराष्ट्रात सांस्कृतिक आणि राजकीय बदल घडवण्यात मोलाचा वाटा आहे. शाहिरी माध्यमाचा उपयोग करुन समाजातील घातक प्रवृत्तीचा घात करण्यासाठी त्यांनी पोवाड्याच्या माध्यमातून समाजात क्रांती घडवली.

शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील पसरणी गावात झाला. साबळे यांचे वडील शेतकरी तर निरक्षर आई जात्यावर दळण दळून ओव्या गाणारी. साबळे यांचे वडीलही माळकरी व वारकरी पंथाचे भजन-कीर्तन करण्यात मग्न असत. आई वडिलांनी गायनाचं बाळकडू त्यांना लहानवयातच दिलं. गावी प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी अमळनेरला सातवीपर्यंतचे शिक्षण घेतले. अमळनेरला साबळे यांना साने गुरुजी भेटले. प्रखर राष्ट्रवाद आणि निस्सीम देशभक्तीसाठीचे धडे साबळेना साने गुरुजींकडून मिळाले.

हे ही वाचा 

पुण्याजवळ उभा राहणार इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर प्रकल्प; मोदी सरकारने दिला निधी

पुण्यात पाणी कपातीबाबत महिनाभराने पुन्हा आढावा बैठक होणार !

भाजपने विरोधकांवर ‘उदयनअस्त्र’ सोडले!

स्वातंत्र्यपूर्व काळात शाहीर साबळेनी हैदराबाद मुक्तिसंग्रामातील प्रचारात सहभाग घेतला. साबळे यांनी
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर समाजातील घातक प्रवृत्तीविरोधात जोरदार टीका केली. 1947 साली त्यांनी ‘जातीयवाद की समाजवाद’ हा पहिला पोवाडा लिहिला. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर ‘गर्जा महाराष्ट्र माझा ‘हे अजरामर गीत शाहिरांनी गायिले. शिवसेना पक्षाच्या स्थापनेच्या काळात शाहिरांनी हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना पाठिंबा दिला. शिवसेना पक्षाचे राजकीय पक्षात रूपांतर झाल्यानंतर शाहीर साबळे यांनी माघार घेतली. वयाच्या 94 व्या वर्षी मुंबईत राहत्या घरी वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी