30 C
Mumbai
Wednesday, May 8, 2024
Homeव्यापार-पैसापुण्याजवळ उभा राहणार इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर प्रकल्प; मोदी सरकारने दिला निधी

पुण्याजवळ उभा राहणार इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर प्रकल्प; मोदी सरकारने दिला निधी

राज्यात उद्योग धंद्याचा विकास व्हावा यासाठी राज्य सरकार केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. उद्योगांच्या वाढीबरोबरच राज्यात रोजगार निर्मिती व्हावी यासाठी देखील प्रयत्न केले जात आहे. एकीकडे विरोधकांकडून राज्यातील उद्योगांचे मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेल्याची टीका होत असताना आता रांजणगाव (पुणे) येथे राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणानुसार ‘इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर’ (EMC) प्रकल्पासाठी मोदी सरकारने पहिल्या टप्प्यातील ६२ कोटी ३९ लाख रुपये एमआयडीसीकडे वर्ग केले आहेत.

केंद्र सरकारने ‘इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर’ (EMC) प्रकल्पासाठी निधी वर्ग केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. या प्रकल्पामुळे राज्यात रोजगारनिर्मितीला चालना देखील मिळणार आहे. केंद्र सरकारने ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी रांजणगाव येथे २९७.११ एकर जागेवर ‘इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर’ उभारणीस मान्यता दिली आहे. या प्रकल्पासाठी ४९२ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यापैकी २०८ कोटी रुपये केंद्राचा हिस्सा असून यातील पहिल्या टप्प्यातील ६२ कोटी ३९ लाख रुपये केंद्राने एमआयडीसीकडे वर्ग केले आहेत.

हे सुद्धा वाचा 
एक फुल, दोन हाफ…. कुणाला म्हणाले उद्धव ठाकरे!
Happy Birthday इशांत शर्मा | क्रिकेटशिवाय इशांतला आवडतात ह्या गोष्टी..
संरपंचाने पेटवली स्वत:ची कार; मराठा आंदोलकांवरील लाठीचार्जचा नोंदवला निषेध

रांजणगाव येथे उभारण्यात येणाऱ्या या प्रकल्पात IFB, LG आणि Gogoro EV Scooter यासारख्या कंपन्यांचा सहभाग असेल. या प्रकल्पामुळे हा परिसर ‘इलेक्ट्रॉनिक क्लस्टर’ म्हणून नावारूपास येईल, अधिक उद्योजक, कंपन्या तेथे आकर्षित होऊन त्यातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे. हे EMC कार्यन्वित करण्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत आणि एमआयडीसीने विशेष परिश्रम घेतले असून त्यांचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी अभिनंदन केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी