28.5 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रManisha Kayande : ठाण्यातील पिडीत तरुणीला मनिषा कायंदे यांचा दिलासा! राहत्या घरी...

Manisha Kayande : ठाण्यातील पिडीत तरुणीला मनिषा कायंदे यांचा दिलासा! राहत्या घरी जाऊन तरुणीची भेट

शिवसेना प्रवक्त्या व आमदार मनिषा कायंदे यांनी पिडीत तरुणीची राहत्या घरी जाऊन भेट घेतली. शिवाय त्या पिडीत तरुणीची विचारपूस करत संपूर्ण शिवसेना तिच्या पाठीशी असल्याचा दिलासाही दिला.

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. त्या ठिकाणी एका रिक्षाचालकाने एका विद्यार्थीनीचा विनयभंग केला असल्याचे उघड झाले होते. शिवाय मुलीला 500 मीटर पर्यंत फरफटत नेल्याचे वास्तवही उघड झाले होते. या घटनेचा व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. या प्रकरणात पोलिसांनी तातडीन दखल घेत रिक्षाचालकाला लगेचच अटक केली. या प्रकरणात शिवसेना प्रवक्त्या व आमदार मनिषा कायंदे यांनी पिडीत तरुणीची राहत्या घरी जाऊन भेट घेतली. शिवाय त्या पिडीत तरुणीची विचारपूस करत संपूर्ण शिवसेना तिच्या पाठीशी असल्याचा दिलासाही दिला. यावेळी मनिषा कायंदे यांच्यासोबत माजी महापौर स्मिता इंदुलकर, जिल्हा महिला संघटक रेखा खोपकर, उपजिल्हा संघटक आकांशा राणे, उपशहर संघटक मंजिरी ढमाले, विभागप्रमुख सुष्मा राणे, उपशाखा संघटक सुनंदा भापकर उपस्थित होत्या.

ऑटोचालकाने महाविद्यालयीन विद्यार्थिनीशी गैरवर्तन केले
ठाण्यातील एका ऑटोचालकाने 21 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केला आणि नंतर तिला ऑटोसोबत ओढत नेले. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला होती. एका सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये एक ऑटो चालक महाविद्यालयीन विद्यार्थ्यासोबत कसा गैरवर्तन करत आहे हे दिसत आहे. त्यानंतर हा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आणि सोशल मीडिया युझर्सने कडक कारवाईची मागणी केली.

हे सुद्धा वाचा

T20 World Cup : आशिया चषक विजेती श्रीलंका टी20 विश्वचषकातून बाहेर! स्पर्धेची सुरुवात निराशाजनक पराभवाने

Devendra Fadanvis : स्टार्टअपसाठी सरकार देणार भरीव आर्थिक साह्य; देवेंद्र फडणवीसांची माहिती

IPL 2023 Auction : आयपीएल 2023 लिलावाची तारीख ठरली! ‘या’ दिवशी रंगणार ऑक्शनची धमाल

विद्यार्थ्याला बळजबरीने ऑटोमध्ये बसविण्याचा प्रयत्न
ऑटोचालक विद्यार्थिनीला जबरदस्तीने ऑटोमध्ये ओढण्याचा प्रयत्न करत असल्याचे सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये दिसत आहे. ऑटो चालकाने भरदिवसा विद्यार्थिनीचा विनयभंग केला. मुलगी रस्त्याच्या कडेला उभी आहे. मग ऑटोचालक तिचा हात पकडून ओढू लागतो. विद्यार्थिनीच्या विरोधामुळे तो यशस्वी होऊ शकला नाही तेव्हा तो ऑटो चालवत मुलीला ओढू लागतो.

घरातून कॉलेजला जाणारी विद्यार्थिनी
विशेष म्हणजे महाविद्यालयीन विद्यार्थिनीसोबत घरातून महाविद्यालयात जात असताना तिच्याशी गैरवर्तन केल्याची ही घटना घडली आहे. कारवाई करत पोलिसांनी या ऑटोचालकाला ठाण्यात अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 354 नुसार गुन्हा दाखल केला आहे. एका कॉन्स्टेबलने ऑटो चालकाला विद्यार्थिनीला ओढण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला तरीही तो थांबला नाही आणि ऑटो चालवत राहिला. त्याने हवालदाराला सोडले. त्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य पाहून पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी