30 C
Mumbai
Monday, July 1, 2024
Homeमहाराष्ट्रलाचखोर महिला प्रांताधिकारी एसीबीच्या जाळ्यात

लाचखोर महिला प्रांताधिकारी एसीबीच्या जाळ्यात

टीम लय भारी

उस्मानाबाद :- उस्मानाबाद जिल्ह्यात वाळू तस्कारांवर कारवाई होऊ नये म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. वाळू तस्करांवर कारवाई होऊ नये म्हणून उस्मानाबादमध्ये दरमहा लाख रुपयांचा हप्ता घेतला जातो. हाच हप्ता घेताना वरिष्ठ अधिकारी मनिषा राशिनकरला अटक करण्यात आली आहे (Manisha Rashinkar has been arrested while taking the installment).

उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम येथील उपविभागीय अधिकारी मनिषा राशिनकर यांच्यासह एकाला मंगळवारी लाचलुचपत विभागाने अटक केली आहे. परंडा तालुक्यातील जेकटेवाडी येथील एका वाळू वाहतूक करणाऱ्या विक्रेत्यास वाळूचा व्यवसाय चालू करण्यासाठी पैशाची मागणी करण्यात आली होती. एक लाख 10 हजार रुपयांची दरमहा हप्तारुपी लाच घेताना त्यांना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. उस्मानाबाद लाचलुचपत विभागाच्या या कारवाईत महसूल विभागाचा एक वरिष्ठ दर्जाचा एक मोठा मासा जाळ्यात अडकल्याने खळबळ उडाली आहे.

डोंगराला तडे, निवासी बेजार, पोलिसांच्या मदतीने नदी केली पार

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी धावले आमदार रोहित पवार

भूम येथील उपविभागीय अधिकारी मनीषा राशीनकर यांच्यासह एका कोतवालास 1 लाख 10 हजारची लाच प्रकरणी अटक करण्यात आली आहे. वाळू व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी दरमहा लाच मागितली होती. मनिषा अरुण राशिनकर आणि कोतवाल विलास नरसींग जानकर यांना अटक करण्यात आली आहे. 1 लाख 10 हजारांची मागणी करून तडजोडी अंती 90 हजार आणि 20 हजार आरोपी जानकर याच्या हस्ते स्विकारले.

Manisha Rashinkar been arrested taking installment
वरिष्ठ अधिकारी मनिषा राशिनकर

महापालिका निवडणुकीसाठी मनसे सज्ज; अमित ठाकरे यांचा नाशिक दौरा

Man arrested for creating false land records, revenue official questioned

तक्रारदार यांचा एक टीप्पर आणि त्याच्या पाहुण्यांचा जेसीबी, तीन ट्रक्टर हे विना कारवाई वाळू वाहतुकीसाठी चालू देण्यासाठी लाच घेतली. या प्रकरणी भुम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्रभर चालू होती. सापळा अधिकारी प्रशांत संपते, पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक कायदा उस्मानाबाद यांनी डॉ. राहुल खाडे, पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग औरंगाबाद ब्रम्हदेव गावडे, अपर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग औरंगाबाद यांनी ही कारवाई केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी