27 C
Mumbai
Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्रगुजरातमध्ये टीआरपी गेम झोनमध्ये भीषण अग्नितांडव

गुजरातमध्ये टीआरपी गेम झोनमध्ये भीषण अग्नितांडव

गुजरातच्या राजकोटमध्ये गेम झोनला भीषण आग लागली आहे. या आगीत आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये बहुतेक जण लहान मुलं आणि महिला आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. राजकोटच्या टीआरपी गेम झोनमध्ये ही आग लागली आहे. हा गेम झोन एका मॉलमध्ये असल्याचं सांगण्यात येत आहे. आतमध्ये आणखी काही मुलं अडकल्याचं सांगण्यात येत आहे. आग लागल्याची माहिती मिळताच फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ही आग एवढी भीषण आहे की एक किलोमीटर लांबपर्यंत आगीचे लोट दिसत होते.

गुजरातच्या राजकोटमध्ये गेम झोनला (TRP game zone) भीषण आग (Massive fire) लागली आहे. या आगीत आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये बहुतेक जण लहान मुलं आणि महिला आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. राजकोटच्या टीआरपी गेम झोनमध्ये (TRP game zone) ही आग लागली आहे. हा गेम झोन (TRP game zone) एका मॉलमध्ये असल्याचं सांगण्यात येत आहे. आतमध्ये आणखी काही मुलं अडकल्याचं सांगण्यात येत आहे. आग लागल्याची माहिती मिळताच फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ही आग एवढी भीषण (Massive fire) आहे की एक किलोमीटर लांबपर्यंत आगीचे लोट दिसत होते.(Massive fire breaks out in TRP game zone in Gujarat)

फायर ब्रिगेडकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राजकोटमध्ये लागलेल्या या आगीचा व्हिडिओही समोर आळा आहे. या व्हिडिओमध्ये संपूर्ण गेम झोन ((TRP game zone)) आगीमध्ये भस्मसात झाला आहे. शाळा-कॉलेजना सुट्टी असल्यामुळे गेम झोनमध्ये मोठ्या प्रमाणावर मुलं येतात, ज्यावेळी ही घटना घडली तेव्हाही तिथे बरीच लहान मुलं होती, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे.राजकोटचा हा गेम झोन ((TRP game zone)) एका टीन शेडच्या खाली सुरू होता. ही आग नेमकी कशाने लागली याचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. गुजरातचे मुख्यमंत्री भुपेन बघेल यांनी या अपघाताबाबत यंत्रणांकडून माहिती घेतली आहे. आगीमध्ये जखमी झालेल्यांना जवळच्या रुग्णालयात उपाचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे.

डोंबिवलीमधील स्फोटाच्या घटनेनंतर आता गुजरात राज्यामधील राजकोट येथील टीआरपी या गेमझोनमध्ये (TRP game zone) मोठी आग लागलीये. या गेम झोनपासून एक किलोमीटर परिसरामध्ये धुर पसरला आहे. शाळकरी लहान मुलांना सुट्टी असल्याने त्यांची या ठिकाणी गर्दी होती, ही घटना घडली त्यावेळी लहान मुलेही उपस्थित होतीत. या मुलांचं काय झालं याबाबत कोणतीही माहिती आतापर्यंत समोर आलेली नाही. एकंदरित अग्नितांडव पाहता मृत्यूचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.राजकोटचा हा गेम झोन ((TRP game zone)) आगीत पूर्णपणे जळून खाक झाला आहे. मृतांची ओळख पटवणं अवघड झालं आहे, कारण आगीत जळल्याने त्यांचे चेहरे ओळखू येत नाहीयेत. गेम झोनच्या मालकाला अटक करण्यात आल्याची माहिती समजत आहे. युवराज सिंग सोलंकी, मनविजय सिंग सोलंकी हे गेम झोनचे मालक आहेत, तर प्रकाश जैन आणि राहुल राठोड हे गेम झोनचे व्यवस्थापक आहेत.

राजकोटच्या गेम झोनमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेवर महापालिका आणि प्रशासनाला तातडीने बचाव आणि मदत कार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत, असं गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी ट्विट केलं आहे.

नेमकी ही आग कशामुळे लागली याबाबतची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. गेम झोनमध्ये आग विझवण्यात अडचणी येत आहेत. जोरदार वारेही वाहत आहेत. त्यामुळे आग विझवण्यात अडचण येत आहे, असं अग्निशमन दलाचे अधिकारी आयव्ही खेर यांनी सांगितलं.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी