27 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्रयावर्षी पाऊस लांबणीवर, शेतकऱ्यांचे आभाळाकडे लागले डोळे

यावर्षी पाऊस लांबणीवर, शेतकऱ्यांचे आभाळाकडे लागले डोळे

 

मोसमी पावसाचे आगमन १ जूनपर्यंत केरळमध्ये होत असतं. परंतु यावर्षी पाऊस उशिराने दाखल होणार आहे, असे हवामान खात्याने वर्तवले आहे. केरळमध्ये पावसाचे अनुकूल वातावरण अजून झालेले दिसत नाही. उष्णतेची लाट अजून काही दिवस वाढणार आहे, असा अंदाज हवामान खात्याने आता व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसानं दडी मारल्यानंतर वातावरणात पुन्हा बदल झाला आहे. आणखी काही दिवस घामाच्या धारा सहन कराव्या लागणार आहेत. अरबी समुद्रात तयार होणाऱ्या चक्रीवादळाचा मान्सूनवर परिणाम झाला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार केरळमध्ये 7 ते 8 जूनपर्यंत मोसमी पाऊस दाखल होण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रात साधारणपणे 13 ते 15 जून दरम्यान पाऊस सुरू होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आग्नेय अरबी समुद्रावरील ढगांचे प्रमाणही वाढत आहे. पुढील तीन ते चार दिवसांत केरळमध्ये मोसमी पाऊस सुरू होण्यास अनुकूल परिस्थिती असेल. दरम्यान, विदर्भात काही ठिकाणी पुढील दोन दिवस मेघगर्जनेसहित वीजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच 7 आणि 8 जूनला विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमान वाढण्याचा अंदाजही व्यक्त केला आहे.

हेही सुध्दा वाचा :

Video : मंत्रालयात घुसले गटाराचे पाणी, महापालिका – मेट्रोने केली PWD ची फजिती ! पावसाळ्याच्या जय्यत तयारीवर फेरले पाणी !

मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. रवींद्र कुलकर्णी; तर पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. सुरेश गोसावी यांची नियु्क्ती

देशात मुस्लिम, ख्रिश्चन समाजाविषयी चिंता वाटावी असे चित्र – शरद पवार 

पुणे आणि आसपासच्या भागातील कमाल तापमानात फारसा बदल होणार नसून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार वारा वाहण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. दरम्यान राज्यातील शेतकरीही पावसाची वाट पाहत आहेत. आता शेतीची कामे सुरू होणार असल्याने पावसाची गरज लागते. यामुळे आता बळीराजाचे डोळे आकाशाकडे लागलेले दिसत आहे. दुसरीकडे यंदाचा मान्सून लांबणीवर गेल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण दिसत आहे.बिहार, पश्चिम बंगाल, तमिळनाडू, तेलंगणात उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट जारी, महाराष्ट्रातील काही भागांत पावसाचा अंदाज.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी