33 C
Mumbai
Tuesday, May 28, 2024
Homeमहाराष्ट्रNarayan Rane : खासदार नारायण राणे कोरोना पॉझिटिव्ह

Narayan Rane : खासदार नारायण राणे कोरोना पॉझिटिव्ह

टीम लय भारी

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. नारायण राणे यांनी स्वत: ट्विट करून या संदर्भात माहिती दिली.

अनलॉक ५ चा टप्पा सुरू झाला आहे. अशा ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच कोरोनाचे ८६ हजारहून अधिक लोकांचे रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. बॉलिवूडपासून ते राजकारणापर्यंत कोरोनाने अनेकांच्या घरात शिरकाव केला आहे.

‘माझी कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. माझी तब्येत अतिशय उत्तम असून डॉक्टरांच्या सल्लानुसार मी काही दिवस आयसोलेट राहणार आहे. गेल्या काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी. लवकरच मी लोकसेवेत पुन्हा रुजू होईन,’ असे नारायण राणे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. आपल्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनीही चाचणी करण्याचे आवाहन नारायण राणे यांनी केले आहे. सध्या त्यांनी स्वत:ला क्वारंटाईन केले असून त्यांच्यावर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरू आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी