30 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeमहाराष्ट्र"हे तर येड्याचे सरकार!" मंत्रीमंडळ बैठकीवर कोट्यवधींच्या उधळपट्टीवरुन नाना पटोलेंचा घणाघात..

“हे तर येड्याचे सरकार!” मंत्रीमंडळ बैठकीवर कोट्यवधींच्या उधळपट्टीवरुन नाना पटोलेंचा घणाघात..

मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृतमहोत्सवाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी नगर मध्ये उद्या शनिवार, (16 सप्टेंबर) महाराष्ट्र शासनाची कॅबिनेट बैठक पार पडणार आहे. तब्बल 7 वर्षानंतर मंत्रिमंडळाची बैठक छत्रपती संभाजी नगर शहरात पार पडणार आहे. मात्र, ही बैठक एका वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आली असून यामुळे राज्य सरकारला मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरे जावे लागत आहे, आतापर्यंत मराठवाड्यात झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री हे ‘सुभेदारी’ या शासकीय विश्रामगृहातच थांबत असत. महाराष्ट्रातल्या अनेक मुख्यमंत्र्यांनी ही आगळीवेगली परंपरा जोपासली होती. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असे न करता फोर स्टार हॉटेलमध्ये राहणे पसंत केले. या हॉटेलमधील सुटचे एक दिवसाचे भाडे तब्बल 35,000 असल्याने मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर विरोधकांनी हल्ला चढवला आहे.

यावर महाराष्ट्र देश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी जोरदार घणाघात केला असून राज्य सरकारला चक्क ‘येड्याचे सरकार’ (EDA सरकार) म्हणून संबोधले आहे. यासंदर्भात बोलताना पटोले म्हणाले की, “राज्यातील येड्याच्या सरकारने सर्व लाजलज्जा सोडलेली दिसत आहे. शेतकरी अस्मानी सुलतानी संकटाचा सामना करत आहे, मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रचंड वाढलेल्या आहेत, मराठा आंदोलनासाठी लोक रस्त्यावर उतरले आहेत. मराठवाड्यासह राज्यात एवढी गंभीर परिस्थिती असताना संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री, मंत्री व अधिकाऱ्यांची जनतेच्या पैशातून अलिशान पंचतारांकित हॉटेलमध्ये बडदास्त ठेवली आहे. सर्वसामान्य जनता महागाईत होरपळत असताना मंत्रीमंडळ बैठकीवर कोटयवधी रुपयांची उधळपट्टी करणे हा मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. स्वतःला संवेदनशील म्हणून घेणारे सरकार प्रत्यक्षात मात्र गेंड्यांच्या कातडीचे आहे.”

“संभाजीनगरमध्ये मंत्रिमंडळ बैठक होऊन मराठवाड्यातील जनतेचे प्रश्नी मार्गी लागत असतील तर त्याचे स्वागतच आहे पण त्यासाठी श्रीमंती थाट कशाला हवा? एकनाथ शिंदे मात्र संभाजीनगरच्या सर्वात महागड्या अलिशान तारांकित हॉटेलमध्ये मुक्काम करणार आहेत. त्यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री, मंत्री यांच्यासाठीही अलिशान हॉटेलमध्ये उत्तम सोय केली आहे. इतर अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठीही हॉटेल व गाड्यांवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. हा बडेजाव करण्याची गरज नव्हती, साधेपणाने शासकीय विश्रामगृहात राहिले असते तर मराठवाड्याच्या जनतेच्या प्रश्नावर चर्चा करता आली नसती का?” असा सवाल पटोले यांनी सरकारला विचारलं आहे.

हे ही वाचा 

वंचितच्या प्रवक्त्यांना मीडियापासून ‘वंचित’ ठेवण्याचे कारस्थान; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीसाठी मंत्रालयात हेलपाटे मारू नका; आता ही माहिती मिळणार अशी…

बळीराजा सुखावणार! राज्यभर जोरदार पावसाची शक्यता

नुकत्याच मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कॅमेरावर रेकॉर्ड झालेल्या संभाषणाच्या वादग्रस्त विडियोचा संदर्भ देत पटोले यांनी टोला लगावला. “बैठक घेऊन बोलून रिकामे होणार आणि मराठवाड्यातील जनतेच्या तोंडाला पाने पुसून निघून जाणार.” असा टोला पटोले यांनी लगावला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी