33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeमंत्रालयमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीसाठी मंत्रालयात हेलपाटे मारू नका; आता ही माहिती मिळणार...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीसाठी मंत्रालयात हेलपाटे मारू नका; आता ही माहिती मिळणार अशी…

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी (CMRF) मिळविण्यासाठी आता मुंबईत मंत्रालयमध्ये येण्याची बिलकुल आवश्यकता नाही, अर्जाचा पाठपुरावा किंवा सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी मंत्रालयात साधा फोन करण्याचीदेखील आवश्यकता नाही. आता आपल्या मोबाईलवरच याचे प्रत्येक उपडेट मिळणार आहेत. CMRF मधून अर्थसाह्य मिळविण्याची प्रक्रिया संपूर्णतः निशुल्क आहे याची राज्यातील सर्व गरजू रुग्णांनी नोंद घ्यावी. गैरप्रकार टाळण्यासाठी रुग्णांनी किंवा रुग्णांच्या नातेवाईकांनी play store वर CMMRF अँप्लिकेशन डाउनलोड करावे आणि स्वतः अर्ज करावा अशी माहिती मंत्रालयातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षचे कक्षप्रमुख मंगेश नरसिंह चिवटे यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीची व्हॉट्सॲप हेल्पलाईन सुरु झालेली आहे. या माध्यमातून अर्जाची स्थिती, निकषात असणाऱ्या आजारांची यादी आणि नोंदणीकृत रुग्णालयांची यादी या विषयी माहिती प्राप्त होईल. 8650567567 या क्रमांकाच्या व्हॉट्सॲपवर केवळ Hi असे पाठवले असता आपणासमोर उपरोक्त तीन पर्याय उपलब्ध असतील. यातील अर्जाची स्थिती या पर्यायावर क्लिक केल्यास लगेचच संबंधीत रुग्णाचा M अर्थात् मिटींग क्रमांक आणि त्यानंतर भ्रमणध्वनी क्रमांक टाकणे गरजेचे आहे. याद्वारे आपणास आपल्या अर्जाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी मदत होईल.

आपण आजारांची यादी या क्रमांक दोनच्या पर्यायावर क्लिक केल्यास आपणास मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमध्ये समाविष्ट असणाऱ्या एकूण 20 आजारांची यादी प्राप्त होईल. आपण नोंदणीकृत रुग्णालये या क्रमांक तीनच्या पर्यायावर क्लिक केल्यास आपणास मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमध्ये महाराष्ट्रातील सर्व नोंदणीकृत रुग्णालयांची यादी पीडीएफ स्वरुपात आपणास प्राप्त होईल. अशीही माहिती चिवटे यांनी दिली.
हे सुद्धा वाचा
सुधीर मुनगंटीवारांच्या कार्यालयासमोर तुम्ही गेलात तर तुमचा ऊर अभिमानाने भरून येईल
बळीराजा सुखावणार! राज्यभर जोरदार पावसाची शक्यता
अनंतनाग दहशतवादी हल्ल्यातील शहीद मेजर आशीष धोंचक यांना अखेरचा निरोप देताना गहिवरला संपूर्ण देश

मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० अंतर्गत ‘मुख्यमंत्री सहाय्यता निधी’ या न्यासाची नोंदणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री, महाराष्ट्र यांच्या अध्यक्षतेखाली याचे व्यवस्थापन केले जाते. मुख्यमंत्री या सहाय्यता निधीची एकूण देखरेख आणि नियंत्रण पाहतात.

उद्दिष्टे:-

शासन निर्णय क्रमांक सीआरएफ-२००१/प्र.क्र.१९७/२००१/२५, दि. १५/११/२००१ अन्वये या निधीची उद्दिष्टे निर्धारित करण्यात आली आहेत. ती खालीलप्रमाणे आहेत –

० राज्यातील तसेच उर्वरित देशातील नैसर्गिक आपत्तींमधील आपत्तीग्रस्त व्यक्तींना मदत करणे.
० जातीय दंगलीत मृत व्यक्तींच्या वारसदारांना तसेच ज्यांना दुखापत झालेली आहे आणि/ किंवा ज्यांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे, त्यांना आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.
० दहशतवादी हल्ल्यात मरण पावलेल्या किंवा दुखापत झालेल्या व्यक्तींच्या वारसदारांना आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.
० रुग्णांना उपचार आणि /किंवा शस्त्रक्रिया करण्यासाठी आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.
० अपघाती मरण पावलेल्या (मोटार/रेल्वे/विमान/जहाज अपघात वगळता) व्यक्तींच्या वारसांना आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.
० आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदतीची आवश्यकता असणाऱ्या विविध संस्थांना आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.
० शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक चर्चासत्रे आणि संमेलने आयोजित करण्यासाठी आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.
० शैक्षणिक आणि वैद्यकीय आस्थापनांच्या इमारती बांधण्याकरीता अंशत: आर्थिक किंवा अन्य स्वरूपात मदत करणे.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी