33 C
Mumbai
Monday, May 20, 2024
Homeराजकीयवंचितच्या प्रवक्त्यांना मीडियापासून 'वंचित' ठेवण्याचे कारस्थान; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल

वंचितच्या प्रवक्त्यांना मीडियापासून ‘वंचित’ ठेवण्याचे कारस्थान; प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल

केंद्रातील मोदी सरकारला पूरक भूमिका घेऊन, विरोधी पक्षांनाच आरोपींच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रयत्न करणे, डिबेटमध्ये त्यांना बोलताना वेगवेगळ्या कारणांनी आडकाठी आणण्याचा प्रयत्न करणे, अशा कारणांमुळे इंडिया आघाडीने काही चॅनल्सच्या न्यूज अँकरच्या डिबेटला आपल्या पक्षाचा प्रतिनिधी न पाठविण्याचा निर्णय घेतला. देशपातळीवरील वृत्त वाहिन्यांमधील 14 न्यूज अँकर्स, पत्रकारांवर इंडिया आघाडीने बहिष्कार घातला आहे, त्यामुळे भाजप आणि संबंधित न्यूज अँकर्सनी इंडिया आघाडीवर टीका केली. इंडिया आघाडीच्या पत्रकारांवर बहिष्कार घालण्याच्या निर्णयावर भाष्य करताना प्रकाश आंबेडकर यांनी देखील प्रस्थापित राजकीय पक्ष आणि वृत्त वाहिन्यांवर टीका केली आहे.

वंचित बहुजन आघाडी हा राज्यपातळीवरील एक प्रमुख पक्ष म्हणून गणला जातो, गेल्या निवडणुकांमध्ये त्यांच्या उमेदवारांना चांगली मते पडली होती. तसेच अनेक सभा, आंदोलनांच्यामाध्यमातून वंचित लोकांच्या प्रश्नांवर आवाज उठवत असतो. मात्र वंचितच्या प्रवक्त्यांना वृत्तवाहिन्यांकडून ‘वंचित’ ठेवण्याचे कारस्थान वृत्तवाहिन्यांकडून केले जात आहे. त्यांना डिबेटमध्ये चर्चेसाठी बोलविलेच जात नसल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

या संदर्भात केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, ”इंडिया आघाडीकडे टेलिव्हिजनवरील चर्चासत्रावर बहिष्कार घालण्याची सोय आहे. आम्ही 2019 मध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अनुक्रमे 41 लाख आणि 25 लाख मते मिळवली आणि आमच्या आकांक्षा आणि मुद्द्यांकडे वर्षानुवर्षे दुर्लक्ष करून आम्हाला वंचित ठेवणार्‍या पक्षांची दुकाने हादरवून टाकली. आणि तरीही मीडिया आमच्या प्रवक्त्यांना चर्चेसाठी आमंत्रित करत नाही. कारण, आम्हाला वंचित आणि बहुजनांचा आवाज ठळकपणे मुख्य प्रवाहातील माध्यमात मांडता येऊ नये, केवळ या हेतूने आमंत्रित केले जात नाही. हे वास्तव आहे असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.”

हे सुद्धा वाचा 
अमीरची मुलगी होणार मराठमोळी सून; पुढील वर्षांत ‘या’ दिवशी वाजणार सनई चौघडे!
वेलकम 3 मधून बाहेर काढल्यानं नाना पाटेकर वैतागले! काय म्हणाले वाचा..
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीसाठी मंत्रालयात हेलपाटे मारू नका; आता ही माहिती मिळणार अशी…

इंडिया आघाडीने काल एक पत्रक काढून देशपातळीवरील वत्तवाहिन्यांमध्ये, संपादक, अँकर, पत्रकार म्हणून काम करणाऱ्या 14 पत्रकारांवर बहिष्कार घातला. यामध्ये आदिती त्यागी, अमन चोप्रा, अमिश देवगण, आनंद नरसिम्हा, अर्नब गोस्वामी, अशोक श्रीवास्तव, चित्रा त्रिपाठी, गौरव सावंत, नाविका कुमार, प्राची पराशर, रुबिका लियाकत, शिव अरूर, सुधीर चौधरी, सुशांत सिन्हा यांचा समावेश आहे. या पत्रकारांवर इंडिया आघाडीने बहिष्कार घातल्यानंतर काहींनी ‘एक्स’ (ट्विटरवर) या बहिष्काराबद्दल आपल्या प्रतिक्रीया व्यक्त केल्या आहेत. तसेच भाजपने देखील इंडिया आघाडीवर टीका केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी