31 C
Mumbai
Wednesday, May 22, 2024
Homeमहाराष्ट्रविकासोन्मुख राजकारणाचे प्रणेते शरद पवार पंतप्रधान होणे आवश्यक, हेमंत पाटील

विकासोन्मुख राजकारणाचे प्रणेते शरद पवार पंतप्रधान होणे आवश्यक, हेमंत पाटील

टीम लय भारी

मुंबई : देशाला विकासोन्मुख राजकारणाचे धडे देणारे, सर्वसामान्य जनता, सहकार क्षेत्र, शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांमधून योग्य मार्ग काढणारे, शहर विकास, शासकीय योजनांची योग्यरित्या अंमलबजावणी करीत विकास कामांसंबंधी सखोल अभ्यास आणि दूरदर्शी व्हिजन केवळ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेबांकडेच आहे. त्यांच्या या विकासोन्मुख समाजकारण,राजकारणाचा विशेष प्रभाव पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)  यांच्यावर आहे. पवारांना त्यामुळे ते आपले गुरू मानतात. पवारांसारख्या गुरूवर्यांना त्यामुळे देशाचे पंतप्रधान होणे देशवासियांच्या अनुषंगाने अत्यंत महत्वाचे आहे, असे स्पष्ट मत इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी शुक्रवारी व्यक्त केले. (Narendra Modi Sharad Pawar Guru then why not Prime Minister : Hemant Patil’s question)

 

गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यापासूनच नरेंद्र मोदी पवारांकडून राजकीय धडे गिरवत आले आहेत. केंद्रात सत्तेवर आल्यावर देखील मोदी न चुकता त्यांचे मार्गदर्शन घेतात. अशात दुरदर्शी व्हिजन असलेला नेता पंतप्रधान का नको? असा सवाल यानिमित्ताने त्यांनी उपस्थित केला. पुण्यातील बारामतीचा विकास कसा केला ? शासकीय योजनेंतर्गत विकास कामे कशा पद्धतीने केली पाहिजे? याचा सुक्ष्म अभ्यास करण्यासाठी मोदींनी त्यांच्या खासदारांच्या शिष्टमंडळाचा अभ्यास दौरा बारामतीला पाठवला होता.

पवारांच्या अभ्यासाचा,राजकीय अनुभवाचा तसेच त्यांचा विकासोन्मुख व्यक्तीमत्वाची देशाला गरज आहे. सध्यस्थिती पवारांएवढ्या उंचीचे नेतृत्व नाही. तेच विरोधकांना एकत्र आणू शकतात. त्यामुळे यूपीए अध्यक्षपदासाठी पवारांचे नावच उचित आहे, असे पाटील म्हणाले.सध्या लखनऊ दौऱ्यावर असलेले हेमंत पाटील बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती आणि समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांची भेट घेणार आहेत. युपीएचे अध्यक्षपदासाठी पवारांच्या नावासंबंधी या दोन्ही नेत्यांची मतं ते जाणून घेतील. शिवाय २०२४ च्या सार्वत्रिकी निवडणुकांच्या अनुषंगाने ते या नेत्यांसोबत चर्चा करणार आहेत.

आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजन,दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या देखील संपर्कात असून लवकरच त्यांची भेट घेईल, अशी माहिती पाटील यांनी दिली. महाराष्ट्राचा सार्वजनिक विकास तसेच सहकार चळवळ उभी करण्यासह तिला अधिक बळकट करण्यात पवार साहेबांचा सिंहाचा वाटा आहे. याचा फायदा पवार साहेबांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून देशाला होईल. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपला विजयापासून रोखायचे असेल तर यूपीएचे अध्यक्षपद शरद पवारांकडे देणे आवश्यक आहे. यूपीएचे अध्यक्ष शरद पवार होणार यात कुठलेही दुमत नसल्याचा दावा देखील हेमंत पाटील यांनी यानिमित्ताने केला.


हे सुद्धा वाचा :

 

Pariksha Pe Charcha live updates: PM Narendra Modi addresses students at Pariksha Pe Charcha event; tells them not to copy friends

काशीळ सोसायटी जिल्ह्यात एक नंबर : हेमंत पाटील

Video : बाळासाहेब थोरात म्हणाले, देशात एक दिवस कॉंग्रेसचा हात येणार आहे; पण…

 

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी