28 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeमहाराष्ट्रव्हॅट कमी केल्यामुळे राज्यात आजपासून ‘सीएनजी’ आणि ‘पीएनजी’ स्वस्त

व्हॅट कमी केल्यामुळे राज्यात आजपासून ‘सीएनजी’ आणि ‘पीएनजी’ स्वस्त

टीम लयभारी

मुंबई : एकीकडे पेट्रोल आणि डिझेलचे भाव (Petrol-Diesel Price Today) वाढत असताना दुसरीकडे मात्र राज्यातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे राज्यातील ‘सीएनजी’, ‘पीएनजी’सारख्या नैसर्गिक गॅसवरील मुल्यवर्धीत कराचा (‘व्हॅट’) दर आज १ एप्रिल २०२२ पासून १३.५ टक्क्यांवरुन ३ टक्क्यांपर्यंत कमी झाल्याने राज्यात घराघरांमध्ये पाईपद्वारे मिळणारा स्वयंपाकाचा गॅस तसेच वाहनांसाठीचे सीएनजी इंधन स्वस्त झाले आहे. ( Petrol-Diesel Price Today)

महानगर गॅसने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार मुंबई आणि परिसरात सीएनजी प्रतिकिलो ६ रुपयांनी स्वस्त झाला आहे.(Petrol-Diesel Price Today) तर पीएनजी हा पाईपद्वारे स्वयंपाकाचा गॅस प्रति एससीएम (स्टॅन्डर्ड क्युबिक मीटर) ३ रुपये ५० पैशांनी स्वस्त झाला आहे. नवीन दराप्रमाणे मुंबई परिसरात सीएनजी ६० रुपये प्रति किलो तर पीएनजी ३६ रुपये प्रति एससीएम असेल.

sp;

व्यवसायिक सिलिंडरच्या दरातमध्ये वाढ

दरम्यान एकीकडे राज्यात सीएनजीचे दर स्वस्त झाले असले, तरी दुसरीकडे मात्र व्यवसायिक गॅसच्या दरात प्रति (Petrol-Diesel Price Today) सिलिंडर २५० रुपयांची वाढ झाली आहे. १ एप्रिल पासून गॅस सिलिंडरचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार घरगुती गॅस सिलिंडरचे दर स्थिर असून, व्यवसायिक सिलिंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. सरकारी ऑईल मार्केटिंग कंपनी OMCs ने दिलेल्या माहितीनुसार आजपासून व्यवसायिक सिलिंडरच्या दरामध्ये तब्बल २५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. २२ मार्च रोजी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती, तर व्यवसायिक सिलिंडर स्वस्त झाले होते. मात्र आज घरगुती सिलिंडरचे दर स्थिर असून, व्यवसायिक (Petrol-Diesel Price Today) सिलिंडरच्या दरात तब्बल २५० रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

हे सुध्दा वाचा : 

Fuel Rates Today: Check Petrol & Diesel Price On 1st April 2022

महागाई विरोधात बाळासाहेब थोरात यांचा आक्रमक पवित्रा

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी