28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रनाशिक मनपा हरली , मुजोर ठेकेदार जिंकला : सिटीलिंक संप मिटला

नाशिक मनपा हरली , मुजोर ठेकेदार जिंकला : सिटीलिंक संप मिटला

गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेला सिटी लिंक संप अखेर मिटला आहे. ठेकेदाराला मनपाने कर्मचाऱ्यांसाठी फेब्रुवारी च्या वेतनाची ७२ लाख रुपये रक्कम बँक खात्यात भरल्याने अखेर या संपावर तोडगा निघाला आहे.याबाबत ठेकेदार, मनपाचे अधिकारी यांच्यात बैठक झाली. हा तोडगा निघाल्याने गुरुवारपासून सर्व बसेस रस्त्यावर धावतील असे सिटी लिंक अधिकाऱ्यांनी सांगितले. महापालिकेने जानेवारी पर्यंतचे वेतन ठेकेदाराला आगाऊ अदा करुनही ठेकेदाराने वाहकांचे वेतन थकवले होते. त्यामुळे वाहकांनी मागील महिन्यात कामबंद आंदोलन केले होते. त्यानंतर ठेकेदाराने एक महिन्याचे वेतन अदा करत उर्वरीत वेतन सात मार्चपर्यंत अदा करतो, असे आश्वासन दिल्यानंतर वाहक कामावर परतले. मात्र ठेकेदाराने फ्रेबुवारीचे वेतन अदा न केल्याने सिटिलिंक वाहकांनी मागील गुरुवारपासून (दि.१४) काम बंद आंदोलन केले.

नाशिक सिटी लिंकचा गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेला (Nashik Citylink buses strike ends for 7th day) संप अखेर मिटला आहे. ठेकेदाराला मनपाने कर्मचाऱ्यांसाठी फेब्रुवारी च्या वेतनाची ७२ लाख रुपये रक्कम बँक खात्यात भरल्याने अखेर या संपावर तोडगा निघाला आहे.याबाबत ठेकेदार, मनपाचे अधिकारी यांच्यात बैठक झाली. हा तोडगा निघाल्याने गुरुवारपासून सर्व बसेस रस्त्यावर धावतील असे सिटी लिंक अधिकाऱ्यांनी सांगितले. महापालिकेने जानेवारी पर्यंतचे वेतन ठेकेदाराला आगाऊ अदा करुनही ठेकेदाराने वाहकांचे वेतन थकवले होते. त्यामुळे वाहकांनी मागील महिन्यात कामबंद आंदोलन केले होते. त्यानंतर ठेकेदाराने एक महिन्याचे वेतन अदा करत उर्वरीत वेतन सात मार्चपर्यंत अदा करतो, असे आश्वासन दिल्यानंतर वाहक कामावर परतले. मात्र ठेकेदाराने फ्रेबुवारीचे वेतन अदा न केल्याने सिटिलिंक वाहकांनी मागील गुरुवारपासून (दि.१४) काम बंद आंदोलन केले.
मागील सलग सात दिवसांपासून तपोवन डेपोतून एकही बस बाहेर पडली नाही. त्यामुळे सिटीलींकच्या बसवर विसंबून असलेल्या प्रवाशांचे हाल होत आहे. दरम्यान, संबंधित ठेकेदाराला मनपा प्रशासनाने अंतिम नोटीस बजावली होती. नवीन ठेकेदारासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यास दोन महिने लागू शकतात. जर विद्यमान ठेकेदाराला अाता लगेच टर्मिनेट केले तर दोन महिने बससेवा ठप्प राहण्याची शक्यता होती. ते पाहता मनपा कारवाई ऐवजी नवीन निविदा प्रक्रिया लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या प्रयत्नात आहे. मनपा प्रशासन लगेच ठेका रद्द करु शकत नसल्याने विद्यमान ठेकेदार मनपाला जुमानेसा झाला होता . नुकताच आयुक्तांनी ठेका रद्द करण्याचा इशारा देखील दिला होता .मात्र अखेर या संपावर बुधवारी तोडगा निघाला आहे.

सिटीलिंकच्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे शहरवासीय बर्‍याच दिवसांपासून अडचणींचा सामना करीत आहेत. या संप काळातील विद्यार्थी पासची रक्कम परत मिळावी व बससेवा पूर्वपदावर यावी या मागण्यांबाबत बुधवारी भाजयुमो तर्फे नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांना निवेदन देण्यात आले होते . नाशिक शहरात मागील ६ दिवसांपासून नाशिक महानगर पालिकेची सिटीलिंक अर्थात नाशिक नाशिक महानगर परिवहन महामंडळाची शहर बससेवा कर्मचाऱ्यांच्या संपामुळे पुन्हा एकदा ठप्प झालेली आहे.
सध्या शहरात १२ वी तसेच अनेक विद्यापीठांच्या पदवीधर परीक्षा सुरू असून सर्वत्र परीक्षाकाळाचे वातावरण आहे. संपामुळे अनेक विद्यार्थांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी हे शहरात महाविद्यालयात येतात, हे सर्व विद्यार्थी सिटीलिंक बसनेच प्रवास करत असल्याने त्यांना सुध्दा त्रासाला सामोरे जावे लागत आहे.अनेक विद्यार्थांनी सिटीलिंक बसचे मासिक पास काढलेले आहेत, संपामुळे पाससाठी भरलेले पैसे देखील वाया जात आहेत. याशिवाय पर्यायी व्यवस्था म्हणून विद्यार्थांना रिक्षा, टॅक्सीने प्रवास करावा लागत असून जादा पैसे मोजावे लागत आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड बसत आहे.

ठेकेदाराला वेतन देण्यासाठी रक्कम अदा करण्यात आली आहे. नवीन ठेक्यासाठी सात दिवसांची मुदतवाढ दिली आहे. आचारसहिंता जारी असल्याने यासंदर्भात निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन पुढील प्रकिया केली जाईल.
प्रदीप चौधरी
अतिरिक्त आयुक्त ,मनपा नाशिक

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी