30 C
Mumbai
Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्रNashik News : काय सांगता! वकील विकतोय बिबट्याची कातडी

Nashik News : काय सांगता! वकील विकतोय बिबट्याची कातडी

नाशिक येथील कृषीनगर परिसरातून बिबट्याची कातडी, चिंकारा व नील गाईच्या शिंग तस्करी प्रकरणी तीन महाविद्यालयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची रवानगी नाशिक मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे.

नाशिक शहरात बिबट्याची कातडी, चिंकारा व नील गाईंच्या शिंग तस्करीचे प्रकरण उघडकीस आले आहे. तस्करीचे प्रकार वारंवार घडत असतात आणि त्यांना चाप बसवण्यासाठी वन विभाग नेहमीच प्रयत्नशील असते परंतु दरवेळी यश मिळतेच असे नाही, मात्र यावेळी वन विभागाकडून तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफार्श करण्यात आला आहे. धक्कादायक बाब अशी की तस्करी करणाऱ्यांमध्ये तीघांचा समावेश असून हे तीघेही जण विद्यार्थी आहेत. दरम्यान तस्करीचे प्रकरण गांभीर्याने लक्षात घेत तीनही मुलांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. ताब्यात घेतलेल्या मुलांपैकी एका मुलाचे वकीलीचे शिक्षण पुर्ण झालेले आहे, दुसरा  एक जण फार्मसी तर दुसरा बीएससीचे शिक्षण घेत आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, नाशिक येथील कृषीनगर परिसरातून बिबट्याची कातडी, चिंकारा व नील गाईच्या शिंग तस्करी प्रकरणी तीन महाविद्यालयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची रवानगी नाशिक मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. सदर कारवाई नाशिकच्या वन विभागाकडून करण्यात आली आहे, परंतु धक्कादायक बाब अशी की या प्रकरणात नाशिकच्या वन कार्यालयातील वॉचमनचा मुलगा संशयित जॉन सुनील लोखंडे याचा सुद्धा सहभाग असल्याचे लक्षात आल्याने एकच गोंधळ उडाला आहे. बिबट्याच्या कातडी तस्करीप्रकरणी खुद्द वन विभागातीलच एका कोणाचा हात असल्याने सुद्धा चर्चेला उधाण आले आहे.

हे सुद्धा वाचा…

Rajasthan Congress : ‘दोन’ खुर्च्यांसाठी काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच

Supreme Court : ‘ज्यांनी स्वेच्छेने पक्षच सोडला आहे, ते पक्षाच्या चिन्हावर दावा करू शकत नाहीत’

BMC News: महानगरपालिका मुंबई शहरातील पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी राबवणार नवीन उपक्रम

सदर कारवाईत नाशिक वन विभागाने बिबट्याच्या कातडीसह तीन संशयितांना ताब्यात घेतले आहेत. तस्करीच्या रॅकेटचा पर्दाफार्श करण्यासाठी वनविभागाने पद्धशीर प्लॅन आखून सापळात रचला होता. यामध्ये वन विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी बनावट ग्राहकांचे सोंग घेतले आणि संशयित व्यक्तींकडून बिबट्याच्या कातडी खरेदीसाठी  कृषी नगर परिसरात गेले. ज्यावेळी विक्री करणाऱ्यांना अधिकारी भेटले तेव्हा ते महाविद्यालयीन तरुण असल्याचे त्यांना लक्षात आले. दरम्यान वन विभागाच्या पथकाने तपासाचा वेग वाढवत प्रकरणाच्या तळाशी जाण्याचा प्रयत्न केला परंतु आठ दिवसांच्या तपासांनंतर सुद्धा बिबट्याची कातडी कुठून आली हे मात्र ते उलगडू शकले नाहीत. दरम्यान या प्रकरणात वन विभागाच्या वाॅचमनचाच मुलगा सूत्रधार असल्याचे यातून लक्षात आले.

गेल्या अनेक दिवसांच्या तपासात वनविभागाने अखेर तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. तस्करी प्रकरणात अटक झालेल्यांमध्ये जॉन सुनील लोखंडे, सिद्धांत मनोज पाटील आणि रोहित एकनाथ आव्हाड या तीघांचा समावेश आहे. संशयित गुन्हेगार जॉन सुनील लोखंडे हा नाशिकच्या वन कार्यालयातील वॉचमनचा मुलगा असून त्याचे वकीलीचे शिक्षण पुर्ण झाले आहे. थेट वन विभागाचा संदर्भ आल्याने जाॅनच्या वडिलांची सुद्धा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान अटकेत असलेल्या इतर दोघांपैकी एकजण फार्मसी तर दुसरा बीएससीचे शिक्षण घेत आहे.

दरम्यान या तीघांसोबत इतर जणांचा सहभाग असणाऱ्यांचे सुद्धा जबाब नोंदवण्यात आलेले आहेत. सदर तीन तरुणांना सध्या कोठडीत ठेवण्यात आलेले असून त्यांच्याकडून आणखी कोणत्या कोणत्या गोष्टींचा उलगडा होणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी