31 C
Mumbai
Monday, May 6, 2024
HomeमनोरंजनMemes : जाणून घ्या ! 'मीम्स'चा इतिहास

Memes : जाणून घ्या ! ‘मीम्स’चा इतिहास

सोशल मीडियावर सद्या मीम्सचा पाऊस पडत असतो. मीम्स हा एक विनोदाचा भाग आहे. त्यामुळे लोकांना तेवढाच विरंगुळा होतो. परंतु काहींना मीम्स (Memes)आवडत नाहीत. मीम्समुळे अनेकांना अपमानीत झाल्या सारखे वाटते. स्वत:ला आवडलेले मीम्स इतरांना शेअर देखील केले जातात. त्यामुळे ते प्रचंड प्रमाणात, प्रचंड वेगाने व्हायरल होतात.

सोशल मीडियावर सद्या मीम्सचा पाऊस पडत असतो. मीम्स हा एक विनोदाचा भाग आहे. त्यामुळे लोकांना तेवढाच विरंगुळा होतो. परंतु काहींना मीम्स (Memes)आवडत नाहीत. मीम्समुळे अनेकांना अपमानीत झाल्या सारखे वाटते. स्वत:ला आवडलेले मीम्स इतरांना शेअर देखील केले जातात. त्यामुळे ते प्रचंड प्रमाणात, प्रचंड वेगाने व्हायरल होतात. आजकाल हे मीम्स विनोदाबरोबरच बिजनेस देखील देतात. त्यामुळे लोक मोठया प्रमाणात मीम्स बनवतात. मीम्स म्हणजे काय ? तर मीम हा शब्द युनानी भाषेमधून आला ‘मीमेमा’ या शब्दाचा अर्थ नक्कल करणे. मीम्स म्हणजे विडंबन, व्यंगचित्राचाच एक भाग आहे. सर्वांत पहिल्यांदाच मीम या शब्दाचा उपयोग करण्यात आला 1976 मध्ये, ब्रिटिश जीवविज्ञान तज्ञ रिचर्ड डॉकिंस यांनी पहिल्यांदा या शब्दाचा वापर केला. त्याच्या ‘द सेल्फिश जीन’ या पुस्तकात त्यांनी या शब्दाचा पहिल्यांदा उपयोग केला. तर त्याचा खरा वापर 2009 मध्ये सुरू झाला. ‘रेज कॉमिक्स’ नावाच्या एका बेब कॉमिकसाठी ‘कार्लोस सरामीरेज’ यांने मीम्सची सुरूवात केली. खऱ्या अर्थांने मीम्सच्या दुनियेला 2008 पासून सुरूवात झाली. कार्लोस हे मीम्सचे जनक आहेत. त्यांच्या नावाने सोशल मीडियावर मीम्स आहेत. पहिल्यांदा मीम्स बनवले त्यावेळी कार्लोस 18 वर्षांचे होते.

हे सुद्धा वाचा

Rajasthan Congress : ‘दोन’ खुर्च्यांसाठी काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच

Chinese food : सावधान ! तुम्ही चायनीज पदार्थ आवडीने खाताय ; मग हे वाचाच……

Devi : परदेशातही आहेत देवीची शक्तीपीठे

त्यांना चित्र काढण्याचे व्यसन लागले होते. ते अभ्यास सोडून तासंतास चित्र रंगवत बसत. मात्र ते कॉप्युटरवर चित्र काढत होते. चित्र काढल्यानंतर ते त्यांच्या आर्ट साईडवर अपलोड करत, एकदा त्यांनी एक रफ कार्टून तयार केला. तो साईटवर अपलोड केला. तो प्रचंड लोकप्रिय झाला. सकाळी उठल्यावर त्यांनी पाहिले तर त्यांचे ते चित्र डूडल वेबसाईवर जोरदारपणे शेअर केले जात होते. हे पाहून त्यांना खूप आनंद झाला. मात्र त्यानंतर त्यांनी अभ्यासाकडे लक्ष केंद्रीत केले. दोन वर्षांनंतर ते परत इंटरनेटशी जोडले गेले. त्यावेळी त्यांनी पाहिले की,  त्यांचा  ट्रोलफेस वर्ल्ड वाईड फेमस झाला होता. 2010 पर्यंत त्यांचे कॉमिक्स जोरदारपणे लोकप्रिय झाले. त्यानंतर लोकांनी त्यांचे ट्रोलफेस कॉफीच्या मगांवर तसेच टी-शर्टवर चिटकवले.इतक्या मोठया प्रमाणात कार्लोस यांचे मीम्स लोकांना आवडले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी