33 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeआरोग्यFlowers : महिलांसाठी खास : तुमच्या केसात माळलेली फुलं, तुमचं आयुष्य वाढवतील

Flowers : महिलांसाठी खास : तुमच्या केसात माळलेली फुलं, तुमचं आयुष्य वाढवतील

नवरात्रोत्सव सुरू झाला आहे. हा काळ म्हणजे सृष्टीच्या सृजनाचा काळ आहे. या काळात वसुंधरा फुलांनी बहरते. आता सृष्टीचा फुलोत्सव सुरू आहे. अनेक प्रकारची फुले (Flowers) या दिवसतात फुलतात. गवताच्या इटूकल्या पात्यामधून सुद्धा प‍िटूकली फुले डोकावत असतात.

नवरात्रोत्सव सुरू झाला आहे. हा काळ म्हणजे सृष्टीच्या सृजनाचा काळ आहे. या काळात वसुंधरा फुलांनी बहरते. आता सृष्टीचा फुलोत्सव सुरू आहे. अनेक प्रकारची फुले (Flowers) या दिवसतात फुलतात. गवताच्या इटूकल्या पात्यामधून सुद्धा प‍िटूकली फुले डोकावत असतात. रंगीबेरंगी फुले, त्यांच्या अगणीक छटा असतात. या फुलांचा रंग देखील तितकाच मोहक असतो. तो नाकात साठवून ठेवावा. फुलांचा सुगंध हा मन प्रफूल्लीत करणारा असतो. मनाला ताजे-तवाने करणारा हा सुगंध माणसाचा ताण हलका करतो. फुलांच्या सुगंधाने नकारात्मकता दूर होते. त्यामुळेच दररोज देवाला फुले वाहतात.

आता नवरात्रीमध्ये देवीला हार, फुले, वेणी, माळा अपर्ण केल्या जातात. फुलं (Flowers) घराच्या कोणत्याही कोपऱ्यात असली तरी संपूर्ण घर सुवासाने भरून टाकतात. त्यामुळे अंगणात तुळशी बरोबरच फुलं झाडे देखील लावतात. फुलांच्या नुसत्या सुगंधानेच नव्हेतर त्यांच्या दर्शनाने देखील मनाला प्रसन्न वाटते. फुलं त्यांचे आकार, त्यांचा सुगंध, त्यांचा रंग सगळेच आकर्षक असते. प्रत्येक फुल आपल्या परिने अभ‍िव्यक्त होत असतो.

आज काल माणसांचे मानसिक आरोग्य खराब होत चालले आहे. त्यावर पुष्पऔषधी हा एक उपाय आहे. काही दशकांपूर्वी मह‍िलांच्या डोक्यात सुंदर फुले दिसायची. सुहास‍िनीतर केसात नेहमीच गजरे, वेणी नाहीतर फुलं माळायच्या. फुलांकडे सौभाग्याचं लेणं म्हणून पाहिले जातं. परंतु आता काळाच ओघात  सण, समारंभ प्रसंगी केसात गजरे माळतात.

केसात सुगंधी फुलं घातले की, सतत येणारा मंद सुगंध मन प्रसन्न करणारा होता. त्यामुळे महिलांना सुगंधी स्प्रे मारण्याची गरज नसे. आता बाहेर जातांना स्प्रे मारावा लागतो. दर रोज देव घरात देवाला फुले वाहिली जात होती. आता सगळे जण देवपूजा करत नाहीत. अनेकांना वेळ देखील नसतो. मोठया शहरांमध्ये दरारोज फुले विकत घ्यायला परवडत नाही. परंतु फुले इतकी उपयोगाची आहेत असा व‍िचार सहसा कोणी करत नाहीत. फुले तुमचे आयुष्य वाढवतात. आपल्या अजूबाजूला फूले असतील तर एक सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते.

त्यामुळे आपण दीर्घायुषी बनण्यास मदत होते. जगभरात अनेक प्रकारच्या शारिरीक तसेच मानस‍िक आजारांवर फुलांच्या औषधांचा वापर करण्यात येतो. फुले आणि पाने तुमच्या भावना नियंत्रीत करण्यास मदत करतात. फुलांच्या औषधाने मेंदू, हृदय, डोळे, कान, पचनशक्तीवर अनुकूल परिणाम होतो. काही तज्ञ तर पुष्प औषधीला नॅचरल रेमिडीज असे देखील म्हणतात. फुलं हे प्रेमाचे, सौंदर्याचे, भक्तीचे, काव्याचे प्रतिक आहेत.

हे सुद्धा वाचा

Chinese food : सावधान ! तुम्ही चायनीज पदार्थ आवडीने खाताय ; मग हे वाचाच……

PFI : तपास यंत्रणांनी पुन्हा एकदा ‘पीएफआय’ ला केले खिळखिळे

Amrita Fadnavis : अमृता फडणवीस यांनी दिले ‘झाडू’ला प्रोत्साहन

अरोमा थेरेपीमध्ये फुलांचा वापर करुन रोग बरे केले जातात. मन अशांत असेल तर कामे देखील ब‍िघडतात. शरिरामध्ये विषारी द्रव्यांचा संचय वाढला की एक ना अनेक कुरबूरी सुरू होतात. त्यावेळी फुलांचा सुगंध मनाला उभारी देतो.

डॉ. बाख हे एक फ्लॉवर थेरपीस्ट आहेत. माणसाचे मन व तन एक अदृश्य शक्ती व्यापून टाकते. त्यामुळे दोन महिन्यात कायम स्वरूपी दोष कमी होतात असे त्यांचे मत आहे. मनाच्या प्रत्येक अवस्थेमध्ये पुष्पऔषधी महत्त्वाचे काम करते. महिलांच्या तर प्रत्येक अवस्थेमध्ये भावना बदलत असतात. त्यामुळे प्रत्येक ऋूतूमध्ये मिळणारी फुले महिलांनी केसात माळणे गरजेचे आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी