31 C
Mumbai
Monday, May 6, 2024
HomeराजकीयRajasthan Congress : 'दोन' खुर्च्यांसाठी काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच

Rajasthan Congress : ‘दोन’ खुर्च्यांसाठी काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच

राजस्थानमध्ये दाेन खुर्च्यांसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. अशोक गेहलोत विरुध्द सच‍िन पायलट हा वाद आता सोनिया गांधीच्या कोर्टात गेला आहे. कदाच‍ित या प्रकरणामध्ये दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होण्याची शक्यता आहे. राजस्थान काँग्रेसमध्ये (Rajasthan Congress) दोन खुर्च्यांसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे.

राजस्थानमध्ये दाेन खुर्च्यांसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. अशोक गेहलोत विरुध्द सच‍िन पायलट हा वाद आता सोनिया गांधीच्या कोर्टात गेला आहे. कदाच‍ित या प्रकरणामध्ये दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होण्याची शक्यता आहे. राजस्थान काँग्रेसमध्ये (Rajasthan Congress) दोन खुर्च्यांसाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्यामध्ये एक खुर्ची मुख्यमंत्री पदाची आहे ; तर दुसरी काँग्रेस अध्यक्षपदाची आहे. राजस्थान काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीसाठी जोरदार घमासान सुरू आहे.

आज सचिन पायलट दिल्लीमध्ये गेले होते. सचिन पायलट यांनी सोन‍िया गांधीची भेट घेऊन त्यांना सांगितले की, अशोक गेहलोत हे काँग्रेसचे अध्यक्ष‍ पदासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री पद सोडावे लागणार आहे. त्यामुळे सच‍िन पायलट हे मुख्यमंत्री पदासाठी आग्रही आहेत. मात्र आज पवन बंसल यांनी दिल्लीमध्ये जाऊन अध्यक्षपदासाठी नामांकन फॉर्म भरला आहे. तसेच शिशि थरुर यांनी देखील नामांकन फॉर्म भरल्याची माहिती समोर आली आहे. मात्र अशोक गेहलोत यांनी फॉम भरला की, नाही या बाबत माहिती मिळालेली नाही. दोन दिवसांमध्ये अध्यक्षपदाचा फॉर्म भरलेल्या नेत्यांची नावे समजणार आहेत.

गेहलोत गटाने घेतलेल्या भूमिकेवरुन सोनिया गांधी नाराज आहेत. राजस्थान काँग्रेसमध्ये (Rajasthan Congress) घडत असलेल्या हालचालींना सोन‍िया गांधींनी गंभीरतेने घेतले आहे. आज सोन‍िया गांधी यांच्या निवास्थानी झालेल्या बैठकीमध्ये काँग्रेसचे मोठे नेते सहभागी झाले होते. यामध्ये अंबिका सोनी, गिर‍िजा व्यास, राजीव शुक्ला, मल्लिकार्जुन खरगे, अजय माकन इत्यादी उपस्थित होते. सोमवारी अजय माकन आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यास्थानमध्ये घडलेल्या राजकीय नाटयाचा घटनाक्रम सादर केला. यामध्ये शांती धरीवाल आणि मंत्री महेश जोशी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. रव‍िवारी आणि सोमवारी शांतीलाल धारीवाला यांच्या घरी पक्षाची बैठक झाली. अशा प्रकारे पक्षाची बैठक घेणे हे काँग्रेस पक्षाच्या नियमावलीमध्ये बसत नाही.

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना विचारुनच या बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या बैठकीमध्ये गेहलोत गटाचे आमदार उपस्थ‍ित राहिले नाहीत. जे गेहलोत गटाचे मंत्री हजर होते. त्यांनी घोषणाबाजी केली. त्यानंतर विधासभेचे उपाध्यक्ष जोशी यांच्याकडे जाऊन राजीनामे द‍िले. त्यावेळी काही आमदारांनी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. 19 ऑक्टोबरपर्यंत हा तीढा सुटला नाही. तर अशोक गेहलोत यांच्या पसंतीचाच मुख्यमंत्री होईल. सचिन पायलट किंवा त्यांच्या समर्थकांपैकी कोणालाही मुख्यमंत्री पद मिळणार नसल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते.

हे सुद्धा वाचा

Chinese food : सावधान ! तुम्ही चायनीज पदार्थ आवडीने खाताय ; मग हे वाचाच……

PFI : तपास यंत्रणांनी पुन्हा एकदा ‘पीएफआय’ ला केले खिळखिळे

Devi : परदेशातही आहेत देवीची शक्तीपीठे

मात्र आमदारांची झालेली बैठक, काही आमदारांनी बैठकीमध्ये टाकेलेला बह‍िष्कार आणि सामूह‍िक राजीनामे यामुळे काँग्रेसची प्रत‍िमा मलीन झाली आहे. हा सर्व घटनाक्रम सोनिया गांधीना सांगण्यात आला आहे. त्यामुळे त्या कोणता निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आज सोन‍िया गांधी सोबत झालेल्या बैठकीनंतर काही आमदारांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. हे प्रकरण शांती धारीवाला आणि महेश जोशींच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. राजस्थानमध्ये निर्माण झालेला पेचप्रसंग सोडवण्यासाठी कमलनाथ यांना ताबडतोब द‍िल्लीमध्ये बोलवण्यात आले आहे. कदाच‍ित दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होऊ शकतो. अशी परिस्थिती राजस्थान काँग्रेसमध्ये निर्माण झाली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी