26 C
Mumbai
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रनाशिकमध्ये बेकायदेशीररित्या देशी कट्टा बाळगणारा पोलिसांच्या ताब्यात

नाशिकमध्ये बेकायदेशीररित्या देशी कट्टा बाळगणारा पोलिसांच्या ताब्यात

नाशकात गुन्हेगारीचा नायनट करण्यासाठी ग्रामीण व शहर पोलीस शर्तीचे प्रयत्न करत आहेत. गुरूवार दि.8 रोजी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार व गुन्हे शाखाचे महेश खांडबहाले यांना सूत्रानुसार माहिती प्राप्त झाली की, आडगाव पोलीस ठाणे हद्दीत युनिव्हर्स इंटरप्राईजेस समोर, मदर तेरेसा रोड, श्रीराम नगर आडगाव येथे एक इसम बेकायदेशीर रित्या देशी बनावटीचा कट्टा स्वतःच्या कब्जात विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगत आहे. त्यानूसार येथील पोलीस उपनिरीक्षक संदेश पाडवी व राजेंद्र घुमरे, नंदकुमार नांदुर्डीकर, सुनील आहेर, मनोहर शिंदे,चंद्रकांत गवळी, विशाल पाटील, तेजस मते, महेश खांडबहाले, विशाल कुवर, समाधान वाजे यांनी सापळा रचून संशयित योगेश चंद्रकांत धांडे (वय 30) रा. योगी दर्शनी अपार्टमेंट, सिताई नगर, ओझर, जि. नाशिक याच्याकडून देशी बनावटीचा कट्टा व १ जिवंत राऊंड जप्त करत त्याचा पंचनामा करून आडगाव पोलीस ठाणे येथे जमा करण्यात आला आहे.

आदिवासी विकास विभागाचा सहाय्यक प्रकल्प अधिकारी अटकेत आश्रमशाळेवर हजर करून घेण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना बुधवारी (दि.७) कळवण सहाय्यक प्रकल्प अधिकाºयाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले. बन्सीलाल महादू पाटील असे या अधिकाºयाचे नाव आहे.

यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, यातील तक्रारदार यांना कळवण प्रकल्प अधिकारी कळवण यांच्या आदेशान्वये आश्रमशाळेवर हजर करून न घेतल्याने त्यांनी सहाय्यक प्रकल्प अधिकारी बन्सीलाल पाटील यांची भेट घेतली. पाटील यांनी दि. १ ते ६ दरम्यान तक्रारदार यांना हजर करून घ्या, असे संबंधित मुख्याध्यापकांना सांगून मदत करण्याच्या मोबदल्यात ५ हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती पाटील यांनी बुधवारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, कळवण येथे दोन हजार रुपये लाचेची रक्कम पंचांच्या समक्ष स्वीकारली. पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर, अप्पर पोलिस अधिक्षक माधव रेड्डी, पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक गायत्री जाधव, हवालदार संदीप वणवे, पोलीस नाईक ज्योती शार्दूल यांच्या पथकाने कारवाई केली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी