27 C
Mumbai
Sunday, December 3, 2023
घरनोकरीउच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या ३७८ जागा

उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या ३७८ जागा

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या राज्यातील उच्चशिक्षण घेतलेल्यांसाठी मोठी बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती सुरू आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या पदासाठी एकूण ३७८ जागा आहेत. शैक्षणिक आर्हता, वयोमर्यादा, पगार, अर्ज करण्याची शेवटची तारीख याबाबतची सर्व माहिती ही अधिकृत वेबसाइटवर नमूद करण्यात आली आहे. यामुळे आता उच्च शिक्षण आणि तंत्रशिक्षण शिक्षीत असलेल्यांना या विभागाच्या पदांचा लाभ घेता येणार आहे. यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार सदैव तत्पर राहते. यात दुय्य्म सेवा आणि प्रथम सेवा असे दोन गट आहेत.

एमपीएससी अंतर्गत  महाराष्ट्र प्राथमिक सेवा आणि दुय्यम सेवा गट-अ, गट-ब च्या एकूण ३७८ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये २९२ जागा ‘अ’ गटासाठी भरण्यात येणार आहेत. तर ब गटासाठी ८६ जागा आहेत. या पदासांठी अर्ज करणारे उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून उच्च शिक्षीत पदवीधर असणे आवश्यक आहे.

हेही वाचा

धनंजय मुंडेंनी सांगितले उद्धव ठाकरेंचे पाप!

‘सुषमा अंधारे यांचा लवकरच…’ मोहित कंबोज यांचा धमकीवजा इशारा

आमदार अपात्रतेसंदर्भात २६ ऑक्टोबरला सुनावणी

‘अ’ गट संवर्ग

‘अ’ गट संवर्गात विविध विषयातील प्रध्यापक, महाराष्ट्र शिक्षण सेवा यांचा समावेश होतो. तर यासाठी ३२ जागा राखिव आहेत. तर याच ‘अ’ गटात विविध विषयातील सहयोगी शिक्षकाच्या पदांसाठी ४६ जागा असतील. सहायक शिक्षक, ग्रंथपाल, शारिरीक शिक्षण, महाराष्ट्र शिक्षण सेवांसाठी २१४ जागा आहेत.

‘ब’ गट संवर्ग

एमपीएससी अंतर्गत भरती सुरू आहे. ब गटामध्ये महाराष्ट्र शिक्षणसेवा अधिव्याख्याता, महाराष्ट्र शिक्षण सेवेसाठी एकूण ८६ पदांची रिक्त जागा आहे. अर्ज प्रक्रिया करण्यासाठी इच्छुकांनी पुढील प्रक्रिया करावी.

अशी करा अर्ज प्रक्रिया

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरती सुरू आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाच्या एकूण ३७८ जागा आहेत. यासाठी इच्छुकांना अर्ज करण्याची २० ऑक्टोबर २०२३ ते ९ नोव्हेंबर २०२३ पर्यंत अंतिम तारीख आहे. या तारखेदरम्यान इच्छुकांनी अर्ज प्रक्रिया करावी. यासाठी https://mpsconline.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा.

 

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी