28 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक अमेय इंडस्ट्रीज प्रा. लि. आणि रॅपेड ॲक्शन फोर्स सिक्युरिटीजवर कारवाईची...

नाशिक अमेय इंडस्ट्रीज प्रा. लि. आणि रॅपेड ॲक्शन फोर्स सिक्युरिटीजवर कारवाईची मागणी

कामावर असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यास पॅरॅलिसिसचा झटका आल्याने त्यास कामगार कायद्यान्वये भरपाई मिळावी याकरिता राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.अमेय इंडस्ट्रीज प्रा. लि. व रॅपेड अॅक्शन फोर्स सिक्युरिटी यांच्यावर चौकशी करून कामगार कायद्या नुसार गुन्हा दाखल करून दंड वसूल करणे बाबत कामगार राज्य विमा महामंडळाला राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदनाचा विषय पुढीलप्रमाणे अमेय इंडस्ट्रीज, अंबड औद्योगिक वसाहत येथे सोमनाथ थोरात हे मागील चार वर्षापासून रॅपेड अॅक्शन फोर्स सिक्युरिटी या ठेकेदाराच्या माध्यमातून सुरक्षा रक्षक म्हणून काम करत आहे.

०२/०२/२०२४ रोजी हे रात्रपाळीस कामावर असताना मध्यरात्री सुमारे २ च्या दरम्यान त्यांना अर्धांगवायूचा झटका आल्याने त्यांना प्रथमोपचारासाठी परिवाराने व्यवस्थापन, प्रशासन व ठेकेदार यांना कामगार विमा कार्ड ची विचारणा केली. त्यांच्या कडून सांगण्यात आले की, आम्ही कामगार विमा व कर्मचारी भविष्य निधी भरत नाही. कामगार कामावर असताना अर्धांगवायू सारखा एवढी मोठी भयावह परिस्थिती असतना देखील दोन्ही प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारचा घटनेचा पंचनामा व नोंद करण्यात आली नाही. अमेय इंडस्ट्रीज व ठेकेदार सर्रासपणे सुरक्षा रक्षक बोर्ड कायद्याचे उलंघन करून त्यांना तुटपुंजे असे मानधन देतात. सुरक्षा रक्षक यांचे कडून बारा तास काम करून घेत आहे. कुठल्याही प्रकारची त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जात नाही. सदर ठेकेदार याच्या कडे सुरक्षारक्षक पुरवणे परवाना आहे की नाही ? याची देखील चौकशी करण्यात यावी. अमेय इंडस्ट्रीज प्रा. लि. आणि रॅपेड अॅक्शन फोर्स सिक्युरिटी या दोन्ही प्रशासनावर लवकरात लवकर कामगार कायद्या नुसार गुन्हा दाखल करून दंड वसूल करण्यात यावा. अशी मागणी कर्मचारी भविष्य निधी कार्यालय व कामगार उपायुक्त यांच्याकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष आडांगळे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी