27.8 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक मध्ये उभारली जातेय आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित सिग्नल यंत्रणा

नाशिक मध्ये उभारली जातेय आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित सिग्नल यंत्रणा

शहरातील सर्वच सिग्नल सध्या स्वयंचलित दिसतात. त्यामुळे एखाद्या सिग्नलवर वाहने नसली तरी ठराविक कालावधीसाठी समोरच्या सिग्नल वरील वाहनधारकांना थांबावेच लागते. मात्र लवकरच हा त्रास नाहीसा होणार असून देशातील इतर मेट्रो पोलीतीन सिटीप्रमाणे नाशिक शहरांमध्ये देखील 40 ठिकाणी १ हजार कॅमेरे असलेले अत्याधुनिक सिग्नल आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानावर आधारित बसवले जाणार आहेत. त्यामुळे सिग्नल वर होणारे वायू प्रदूषण कमी होण्यासोबतच वाहनधारकांचा वेळही वाचण्यास मदत होणार आहे. यासाठीशहर वाहतूक पोलिस दलांच्या नऊ महिला कॉन्स्टेबल यांना पोलिस आयुक्तालयात असलेल्या कमांड ॲन्ड कंट्रोल सेंटरमध्ये प्रशिक्षण देण्यात येत आहे.

शहरातील सर्वच सिग्नल सध्या स्वयंचलित दिसतात. त्यामुळे एखाद्या सिग्नलवर वाहने नसली तरी ठराविक कालावधीसाठी समोरच्या सिग्नल (signal) वरील वाहनधारकांना थांबावेच लागते. मात्र लवकरच हा त्रास नाहीसा होणार असून देशातील इतर मेट्रो पोलीतीन सिटीप्रमाणे नाशिक शहरांमध्ये देखील 40 ठिकाणी १ हजार कॅमेरे असलेले अत्याधुनिक सिग्नल आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Artificial intelligence) तंत्रज्ञानावर आधारित बसवले जाणार आहेत. त्यामुळे सिग्नल वर होणारे वायू प्रदूषण कमी होण्यासोबतच वाहनधारकांचा वेळही वाचण्यास मदत होणार आहे. यासाठीशहर वाहतूक पोलिस दलांच्या नऊ महिला कॉन्स्टेबल यांना पोलिस आयुक्तालयात असलेल्या कमांड ॲन्ड कंट्रोल सेंटरमध्ये प्रशिक्षण देण्यात येत आहे.(Artificial intelligence-based signal system being set up in Nashik )

प्रशिक्षणामध्ये आपत्ती निरीक्षण, सार्वजनिक ठिकाणी पब्लिक अनाउन्समेंट सिस्टीमवरून घोषणा करणे, वाहतूक मॉनिटरिंग आणि ई-चलन जारी करणे आदि बाबींचा समावेश आहे. शहरातील ४० सिग्नलवर १००० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे लक्ष ठेवले जाणार आहे. त्यातील कॅमेरे नियंत्रण कक्षाला जोडण्याचे काम सुरू असून यासाठी आवश्यक असलेल्या ऑप्टिकल फायबर केबलचे काम बीएसएनएल कंपनीद्वारे प्रगतिपथावर असून त्यासाठी सध्या शहरात अनेक ठिकाणी खोदकाम केले जात आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी हे काम पूर्ण होईल यासाठी प्रयत्न केले जात आहेत.या प्रणालीमुळे वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी, तसेच शहरातील रहदारीवर नियंत्रण मिळवण्यासाठीही वाहतूकपोलिसांना मोठी मदत होणार आहे.या प्रणालीमुळे वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी, तसेच शहरातील रहदारीवर नियंत्रण मिळवण्यासाठीही वाहतूकपोलिसांना मोठी मदत होणार आहे.

सिग्नल तोडल्यास थेट मोबाईलवर ई चलन
ही प्रणाली या तंत्रज्ञानाच्या मदतीने कार्यरत राहील. यामध्ये प्रामुख्याने एएनपीआर व आरएलव्हीडी या दोन प्रकारच्या कॅमेऱ्यांचा समावेश असणार आहे. वाहन मालकाच्या रजिस्टर मोबाईल क्रमांकावर उल्लंघनाच्या फोटोसह दंडाचे ई- चलन प्राप्त होईल.

कुंभमेळ्यात गर्दी नियंत्रणासाठी होणार लाभ
यासोबतच नाशिक शहरामध्ये सन २०२७ कुंभमेळ्याच्या निमित्ताने जे लाखो भाविक येतील त्यांच्या सुरक्षिततेसाठी देखील या यंत्रणेचा मोठ्या प्रमाणात उपयोग होईल असा दावा स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी केला आहे.

देशातील अनेक मेट्रो पॉलिटिन शहरामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (Ai) वर आधारित सिग्नल यंत्रणा आहे. तीच नाशिक शहरात ४० सिग्नल मध्ये कार्यान्वित करण्याचे काम सुरू असून १००० कॅमेरे याठिकाणी असतील.यासाठी सुमारे १५० कोटींचा खर्च केला जाणार असून १५ मे पर्यंत काम पूर्ण होणे अपेक्षित आहे.
सुमंत मोरे,मुख्य कार्यकारी अधिकारी,स्मार्ट सिटी नाशिक

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी