31 C
Mumbai
Friday, May 3, 2024
Homeराजकीयदेवेंद्र फडणवीस म्हणाले, आमदार; मंत्री करतो; केंद्रात मंत्री करतो, तरीही जानकर यांनी...

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आमदार; मंत्री करतो; केंद्रात मंत्री करतो, तरीही जानकर यांनी ऐकले नाही

माढा लोकसभा मतदारसंघाच्या आखाड्यात धैर्यशिल मोहिते पाटील व रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यामध्ये लढत रंगली आहे. विजयसिंह मोहिते पाटील यांनी आपले राखून ठेवलेले एकेक डाव बाहेर काढायला सुरूवात केलीय. उत्तम जानकर हा सुद्धा एक हुकमी डाव मोहिते पाटलांनी बाहेर काढलाय. जानकर यांना आपल्या कळपात ओढण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रयत्न केले. ही कहाणी आहे, आठवडाभरापूर्वीची. या सत्य घटनेच्या कहाणीला प्रारंभ करण्याअगोदर माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की

माढा लोकसभा मतदारसंघाच्या आखाड्यात धैर्यशिल मोहिते पाटील व रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यामध्ये लढत रंगली आहे(Devendra Fadanvis told to Janakar). विजयसिंह मोहिते पाटील यांनी आपले राखून ठेवलेले एकेक डाव बाहेर काढायला सुरूवात केलीय. उत्तम जानकर हा सुद्धा एक हुकमी डाव मोहिते पाटलांनी बाहेर काढलाय). विजयसिंह मोहिते पाटील यांनी आपले राखून ठेवलेले एकेक डाव बाहेर काढायला सुरूवात केलीय. उत्तम जानकर हा सुद्धा एक हुकमी डाव मोहिते पाटलांनी बाहेर काढलाय. जानकर यांना आपल्या कळपात ओढण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रयत्न केले. ही कहाणी आहे, आठवडाभरापूर्वीची. या सत्य घटनेच्या कहाणीला प्रारंभ करण्याअगोदर माझी तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की, हा व्हिडीओ पाहून तुम्ही मोकळेच पुढे जावू नका. तुम्ही आमचा लय भारीचा यू ट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. आमच्या फेसबूक पेजला लाईक व फॉलो करा. ऐका तर ही आठवडाभरापूर्वीची अस्सल व खरीखुरी कहाणी. मोहिते पाटील यांनी भाजपला रामराम ठोकला, अन् जाहिररित्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. आपण सगळ्यांनी तो प्रवेश सोहळा पाहिलाच असेल. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची जागा धोक्यात आलीय. आता गोळाबेरीज करण्याची गरज आहे, हे लक्षात घेवून रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि जयकुमार गोरे ही बंडू खंडूची जोडी कामाला लागली. त्यांनी उत्तम जानकर आणि नारायणआबा पाटील यांना दोघांची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक आयोजित केली.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी