31 C
Mumbai
Thursday, May 23, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक शहरात ऐन उन्हाळ्यात महामार्ग बस स्टॅन्डचे बांधकाम

नाशिक शहरात ऐन उन्हाळ्यात महामार्ग बस स्टॅन्डचे बांधकाम

फेब्रुवारी महिन्यात राज्यातील पहिल्या वातानुकूलित मेळा बस स्टॅन्डचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण झाले. त्यांनतर काही दिवसातच मुंबई नाका येथील महामार्ग बस स्टॅन्ड नूतनीकरणाचे काम महामंडळाने सूरु केले आहे. मात्र ऐन उन्हाळ्यात प्रवाशांची गर्दी असताना येथे काम सुरु केल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे तर नागरिकांची पायपीट होण्यासोबतच येथे सध्या सर्वत्र धुळीचे साम्रज्या पसरलेले दिसून येत आहे.

फेब्रुवारी महिन्यात राज्यातील पहिल्या वातानुकूलित मेळा बस स्टॅन्डचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण झाले. त्यांनतर काही दिवसातच मुंबई नाका येथील महामार्ग बस स्टॅन्ड (highway bus stand) नूतनीकरणाचे (Construction) काम महामंडळाने सूरु केले आहे. मात्र ऐन उन्हाळ्यात प्रवाशांची गर्दी असताना येथे काम सुरु केल्याने प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे तर नागरिकांची पायपीट होण्यासोबतच येथे सध्या सर्वत्र धुळीचे साम्रज्या पसरलेले दिसून येत आहे.(Construction of highway bus stand in Nashik city in summer)

मुंबई, सांगली, सातारा, अहमदनगर , सोलापूर, सुरत, अहमदाबाद आदी ठिकाणी महामार्ग बस स्टॅन्ड (highway bus stand) वरून बसेस जातात. जुने सिबिएस येथील बसेसची गर्दी वाढल्यांनंतर ठक्कर बाजार आणि त्यानंतर मी मेळा स्टँडची निर्मिती झाली. आता मेळा स्टँडच्या धर्तीवर पीपीपी तत्वावर महामार्ग बस स्टँडची (highway bus stand) उभारणी केली जात आहे. गेल्या काही दिवसापासून या ठिकाणी बांधकाम  (Construction) सुरु असले तरी जुने सिबिएस किंवा ठक्कर बाजार येथून येणार्या प्रवाशांना येथे बांधकाम सुरु असल्याचा कोणताही फलक असल्याचे दिसत नाही . त्यामुळे त्यांना आपले बॅगा किंवा अन्य ओझे घेऊन भर उन्हात पायपीट करावी लागते. मेळा बस स्टॅन्ड सुरु झाल्यापासून ठक्कर बाजार बस स्थानक वरील गर्दी काही प्रमाणात कमी झाली आहे त्यामुळे महामार्ग बस स्टॅन्ड (highway bus stand) चे काम सुरु असताना येथून सुटणाऱ्या बसेस ठक्कर बस स्थानक येथून काही कालावधीकरता सोडणे शक्य होते असा सुर काही प्रवासी संघटना आणि प्रवाशांनी व्यक्त केला आहे.

असे असेल अत्याधुनिक महामार्ग बस स्टॅंड (highway bus stand)
यामध्ये महामंडळाचे प्रशस्त प्रशासकीय कार्यालय, शॉपिंग मॉल , रेस्टारंट , शॉपिंग सेंटर, प्रवाशांसाठी वातानुकूलित वेटिंग रूम, प्रसाधन गृह आदी सोयि सुवीधा उपलब्ध राहणार आहेत.

एप्रिल मे महिण्यात सर्वत्र प्रवाशांची गर्दी असते. त्यात भर उन्हात प्रवाशांना पायपीट करावी लागत आहे. येथे पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध नाही तसेच धुळीचे प्रमाण मोठे असल्याने प्रवाशांना मोठा त्रास होत आहे .
भीमाशंकर वाघमारे , प्रवाशी उस्मानाबाद

आम्ही त्रंबकेश्वर वरून आलो. आमच्यासोबत काही जेष्ठ नागरिक देखील आहेत. आम्हाला हे बस स्टॅन्ड चे बांधकाम सुरु असल्याचे माहीत नाही. आम्हाला रिक्षाचालकाने दुसऱ्या टोकाला उतरवले त्यामुळे आम्हाला भर उन्हात पायपीट करावी लागत आहे.
पुष्पलता भालके, परभणी ,प्रवाशी

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी