28 C
Mumbai
Saturday, April 13, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक प्लास्टर ऑफ पॉरिसच्या ऐवजी पर्यावरण पुरक मुर्ती बनविण्यासाठी विविध पर्यायांचे प्रात्याक्षिक...

नाशिक प्लास्टर ऑफ पॉरिसच्या ऐवजी पर्यावरण पुरक मुर्ती बनविण्यासाठी विविध पर्यायांचे प्रात्याक्षिक आयोजन

नाशिक महानगर पालिकेच्या वतिने प्लास्टर ऑफ पॉरिस (POP) च्या ऐवजी पर्यावरण पुरक मुर्ती बनविण्यासाठी विविध पर्यायांचे प्रात्याक्षिक (DEMO) महात्मा फुले कला दालन येथे आयोजित करण्यात आले होते. मूर्तिकार व पर्यावरण प्रेमींच्या उपस्थितीत विविध प्रात्याक्षिक पार पडली. यामध्ये २६ मूर्तिकार व पर्यावरण प्रेमी सहभागी झाले होते.नाशिक कार्यक्षेत्रात पर्यावरण विषयक कामकाज करण्यात येत आहे. सालाबाद प्रमाणे दरवर्षी मनपा हददीत मुर्तीकार प्लास्टर ऑफ पॉरिसच्या (POP) मुर्ती बनवुन मुर्तींची विक्री करतात. प्लास्टर ऑफ पॉरिस (POP) च्या मुर्तींमुळे पर्यावरणास हानी पोहोचते.

नाशिक महानगर पालिकेच्या वतिने प्लास्टर ऑफ पॉरिस (POP) च्या ऐवजी पर्यावरण पुरक मुर्ती बनविण्यासाठी विविध पर्यायांचे प्रात्याक्षिक (DEMO) महात्मा फुले कला दालन येथे आयोजित करण्यात आले होते. मूर्तिकार व पर्यावरण प्रेमींच्या उपस्थितीत विविध प्रात्याक्षिक पार पडली. यामध्ये २६ मूर्तिकार व पर्यावरण प्रेमी सहभागी झाले होते.नाशिक कार्यक्षेत्रात पर्यावरण विषयक कामकाज करण्यात येत आहे. सालाबाद प्रमाणे दरवर्षी मनपा हददीत मुर्तीकार प्लास्टर ऑफ पॉरिसच्या (POP) मुर्ती बनवुन मुर्तींची विक्री करतात. प्लास्टर ऑफ पॉरिस (POP) च्या मुर्तींमुळे पर्यावरणास हानी पोहोचते.मा.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार विविध सण साजरे करतांना POP मुर्ती विसर्जन केल्यामुळे पर्यावरणाची मोठी हाणी होऊ नये म्हणुन POP मुर्त्यांवर पुर्णत: बंदी घालण्यात आली आहे.

या अनुषंगाने केंद्रीय प्रदुषण नियंत्रण मंडळ व पर्यावरण विभाग महाराष्ट्र शासन यांनी दिलेल्या निर्देशांचे पालन करुन येणाऱ्या काळातील बरेचसे सण, उत्सव प्रदुषण मुक्त पध्दतीने साजरे करण्याच्या दृष्टीने आता पासुनच नियोजन करणे गरजेचे असल्याने प्रदुषण मुक्त व पर्यावरण पुरक पध्दतीने सण साजरे होतील यासाठी नाशिक महानगरपालिकेकडुन POP मुर्ती ऐवजी पर्यावरण पुरक मुर्ती बनविण्यासाठी आपणाकडे कुठला नैसर्गिक पर्याय आहे या बाबत चर्चा झाली. याची सर्वांना माहिती मिळावी व येणाऱ्या उत्सवात त्याचा वापर होण्याकरिता नाशिक महानगरपालिकेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात २६ मूर्तिकार व पर्यावरण प्रेमी यांनी सहभाग नोंदविला.त्यात POP मुर्ती एैवजी इतर पर्यावरण पुरक पर्यांयांचे प्रात्यक्षिक (DEMO) सादरीकरण केले.

लिबर्टी अर्थवेअर आर्ट संगमनेर हेमंत जोर्वेकर यांनी धरणाच्या मातीपासुन मूर्ती तयार करण्याचे प्रात्यक्षिक सादर केले. नाशिक जिल्ह्यास आवश्यक एवढी शाडू माती व शाडू मातीच्या कच्च्या मूर्ती उपलब्ध करून देण्यात येतील असे भव्य विजय चित्तेमालेगाव यांनी यावेळी कार्यक्रमात सांगितले. पंचगवे गणपतीची लाल मातीची मूर्ती स्मिता शिंपी यांनी त्याचे सादरीकरण केले व व पुढील शिबिरात प्रात्यक्षिकाची सादरीकरण केले जाईल असे सांगितले. दर्शन जगताप यांनी कागदी कागदाच्या लगद्यापासून पर्यावरण पूरक गणपतीच्या मुर्त्यांचे सादरीकरण पुढील शिबिरात सादरीकरण केले जाईल असे या कार्यक्रमात सांगितले.

या शिबिरास शहर व जिल्ह्यातून मूर्तिकार व पर्यावरण प्रेमी उपस्थित होते.त्यात देविदास सोनवणे, संजय सोनार, योगेश रसाळ,किरण जाधव, पंकज भामरे,संतोष शहरकर,राजीव सोनवणे, विनायक जाधव, सचिन गायकवाड,सोपान सोनवणे, विठ्ठल रसाळ, अरुण कदम, गणेश परदेशी, शिवाजी पवार, रोहिणी मैंड आदींनी सहभाग नोंदविला.
नाशिक महानगरपालिकेच्या वतीने आयोजित या शिबिरात पर्यावरण विभागाचे उपायुक्त डॉ.विजयकुमार मुंडे यांनी सर्वांचे स्वागत करून जास्तीत जास्त मूर्तिकार पर्यावरण प्रेमी यांनी सहभाग नोंदवावा व पर्यावरण पूरक साधनांचा वापर करून गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन यावेळी कार्यक्रमात केले तसेच उपस्थित मूर्तिकार व पर्यावरण प्रेमी यांचा गौरव केला. शिबिर यशस्वी करण्यासाठी पर्यावरण विभागाचे मनोज धामणे, मोहन बुवा, दीपक काळे, कुलकर्णी यांच्यासह अधिकारी कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी