31 C
Mumbai
Thursday, May 23, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रमतमोजणी केंद्रावर ‘जॅमर’ बसवा; उद्धव ठाकरे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

मतमोजणी केंद्रावर ‘जॅमर’ बसवा; उद्धव ठाकरे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी

नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी नाशिकमध्ये एकाच ठिकाणी होणार असल्याने याठिकाणी एक किलो मीटरच्या परिसरात मोबाईल ‘जॅमर’ बसवण्याचे आवाहन शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. नाशिक व दिंडोरी लोकसभा निवडणुकीसाठी २० मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास शुक्रवार (ता.२६) पासून प्रारंभ होत आहे. अर्ज भरताना काय काळजी घ्यावी याविषयी जिल्हाधिकारी जलज शर्मा व निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांनी सर्वपक्षीय नेत्यांना माहिती दिली. उमेदवाराला अर्ज भरताना शपथपत्रातील सर्व रकाने भरणे बंधनकारक आहे, अन्यथा अर्ज बाद होईल, अशा सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिल्या.

नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी नाशिकमध्ये एकाच ठिकाणी होणार असल्याने याठिकाणी एक किलो मीटरच्या परिसरात मोबाईल ‘जॅमर’ (jammers) बसवण्याचे आवाहन शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. नाशिक व दिंडोरी लोकसभा निवडणुकीसाठी २० मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास शुक्रवार (ता.२६) पासून प्रारंभ होत आहे. अर्ज भरताना काय काळजी घ्यावी याविषयी जिल्हाधिकारी जलज शर्मा व निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांनी सर्वपक्षीय नेत्यांना माहिती दिली. उमेदवाराला अर्ज भरताना शपथपत्रातील सर्व रकाने भरणे बंधनकारक आहे, अन्यथा अर्ज बाद होईल, अशा सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिल्या.(Install jammers at counting centres; Uddhav Thackeray demands district collector)

उमेदवारी अर्ज भरण्याबाबत जिल्हाधिकारी शर्मा, निवडणूक उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांनी यांनी सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेत मार्गदर्शन केले.

बैठकीत शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाचे शहर संघटक मसूद जिलानी यांनी मतमोजणी केंद्रावर जॅमर बसवण्याची मागणी केली. याविषयी लेखी मागणी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले. तसेच मतदान केंद्रावर उमेदवारांचे फलक लावले जातात. त्याविषयी निवडणूक आयोगाने नियम घालून दिले आहेत.
पण माहितीअभावी पोलिस त्याला प्रतिबंध करतात आणि यातून वाद निर्माण होण्याची शक्यता असते. याविषयीचे नियम पोलिसांना सांगितल्यास उद्भवणारे वाद कमी होतील. मतपेट्या सील करताना उमेदवारांच्या प्रतिनिधींना त्यांचे स्वत:चे सील लावण्याची परवानगी असल्याचे उपजिल्हाधिकारी डॉ. मंगरूळे यांनी सांगितले.

परराज्यातील गाड्या थांबवा

नाशिक व दिंडोरी लोकसभेचे मतदान पाचव्या टप्प्यात होणार आहे. यापूर्वी गुजरात, मध्यप्रदेश येथील मतदान पार पडणार आहे. त्यामुळे आपल्या मतदानाच्या दोन-तीन दिवस आधी गाड्या भरून लोक येतात आणि येथील मतदारांना प्रलोभन देतात. त्याचा मतदारांवर विपरीत परिणाम होतो. या गाड्या थांबवण्याचे आवाहन जिलानी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी