31 C
Mumbai
Monday, May 6, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक शहरासह जिल्ह्यात महावीर जयंतीचा उत्साह

नाशिक शहरासह जिल्ह्यात महावीर जयंतीचा उत्साह

मानवी कल्याण आणि विश्वशांती करिता भगवान महावीरांचे तत्वज्ञान आणि त्यागी जीवनाचा अंगीकारच मानवास उपकारी ठरेल. भ्रष्टाचार आणि अतिरेकी आक्रमणातून आपण सर्वनाश आणि कालांतराने आत्मनाश करून घेतो. आवश्यकतेपेक्षा अधिक लोभी संग्रह आपल्या जीवनातील शांतता नाहीशी करते आणि चिंताग्रस्तचे ग्रहण लागते. भक्ती आणि संस्कार हेच आपले कल्याणकारी जिवन आहे असे प्रतिपादन परम पुज्य लब्धिवल्लभ विजयजी महाराज यांनी केले. महाकवी कालिदास कलामंदिर येथे आयोजित भगवान महावीर जन्मकल्याण सोहळ्यात ते बोलत होते.- भगवान महावीर जन्मोत्सव हे पर्व जैन समाजातच नव्हे तर संपूर्ण विश्वाचा गौरव दिन आहे.

मानवी कल्याण आणि विश्वशांती करिता भगवान महावीरांचे तत्वज्ञान आणि त्यागी जीवनाचा अंगीकारच मानवास उपकारी ठरेल. भ्रष्टाचार आणि अतिरेकी आक्रमणातून आपण सर्वनाश आणि कालांतराने आत्मनाश करून घेतो. आवश्यकतेपेक्षा अधिक लोभी संग्रह आपल्या जीवनातील शांतता नाहीशी करते आणि चिंताग्रस्तचे ग्रहण लागते. भक्ती आणि संस्कार हेच आपले कल्याणकारी जिवन आहे असे प्रतिपादन परम पुज्य लब्धिवल्लभ विजयजी महाराज यांनी केले. महाकवी कालिदास कलामंदिर येथे आयोजित भगवान महावीर जन्मकल्याण सोहळ्यात ते बोलत होते.- भगवान महावीर जन्मोत्सव (Mahavir Jayanti) हे पर्व जैन समाजातच नव्हे तर संपूर्ण विश्वाचा गौरव दिन आहे. (Mahavir Jayanti celebrations in Nashik city and district)

समाज बांधवांनी भगवान महावीर यांचा सत्य, अहिंसेचा संदेश संपूर्ण विश्वात न्यावा, क्रोध, मोह, माया, लोभ, अहंकार यांचा त्याग केल्यास प्रत्येक आत्मा, परमात्मा बनु शकतो. सकल जैन समजाच्या एकजुटीचे प्रतिक म्हणजे नाशिकला साजरा करण्यात येणारा महावीर जन्मकल्याणक महोत्सव होय असेही ते म्हणाले.
रविवारी भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सव सकल जैन समाजाच्या वतीने साजरा करण्यात आला, सकाळी आठच्या सुमारास दहीपूल येथील श्री. धर्मनाथ देरासर येथुन शोभायात्रेची सुरुवात होऊन श्री. चिंतामणी पार्श्वनाथ जैन श्वेतांबर मंदिर, जुनी तांबट लेन, श्री. दिगंबर जैन मंदिर भद्रकाली, गाडगे महाराज पुतळा, मेनरोड, धुमाळ पॉईंट, मेनरोड, रविवार कारंजा जैन स्थानक, टिळक पथ, नेहरु गार्डन, शालीमार मार्गे महाकवी कालिदास कला मंदिर येथे समाप्त झाली. दहीपुला पासुन सुरु झालेल्या मिरणुकीत आवाल वृध्दांनी शुभ्रवस्त्र परिधान केले होते. बैंड पथकांच्या तालावर युवक-युवती जल्लोषपूर्ण घोषणा देत होते. भगवान महावीरांच्या जीवनावरील भक्ती गीतांमुळे भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. जैन सेवा संघाचे अध्यक्ष सचिन गांग यांनी उपस्थित सकल जैन समाज साजरी करीत असलेल्या या महोत्सवाचे ऐतिहासिक महत्व व जैन समाजाचे विराट ऐक्याचे प्रस्ताविक करून उपस्थितांचे स्वागत केले. सर्वांच्या सहयोगामुळे सकल समाजाचे ऐक्य दिवसेंदिवस मजबुत होत असल्याचे सचिन गांग यांनी सांगितले. जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष अमित कोठारी यांनी मनोगत व्यक्त केले. समारोहाचे संचालन राजेंद्र पहाडे, जयेश शहा, ललीत मोदी यांनी आभार प्रदर्शन विनित शहा यांनी केले.

शोभायात्रा मार्गावर विविध संस्थांनी भाविकांसाठी जलपान व्यवस्था केली होती, त्यामुळे मार्गावर कचरा जमा होतो तो कचरा क्लीन नाशिक करिता जे एस जी प्लॅटीनम ग्रुप तर्फे संकलीत करुन घंटागाडीत जमा करून आदर्श निर्माण केला.

भालेकर मैदान वरील भव्य मंडपात अत्यंत नियोजनबध्दरित्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हजारो लोक एकाच वेळी एकाच छताखाली महाप्रसादाचा आस्वाद घेत होते. या महाप्रसादाच्या आयोजनासाठी स्व. सौ. ज्योती राजेंद्र पहाडे यांचे स्मृती प्रित्यर्थ राजेंद्र पहाडे परिवार, सम्मेद शिखर जैन सोशल यात्रा ग्रुप परिवाराच्या वतीने लालाज केटरिंग यांच्या सहयोगाने करण्यात आले होते.. शहरात निघालेल्या मिरवणूकीत “अंहिसा परमोधर्म की जय”, “जैन धर्म की जय”, “जोर से बोलो जय महावीर “, च्या जय घोषाने अवघे शहर दुमदुमले. नाशिक ढोल पथकासोबत युवक, युवतींचा उत्साहवर्धक सहभाग वाखण्याजोगा होता. भगवान महावीरांची ध्यानस्त प्रतिमा, अन्न वाचवा (वाया घालु नका), स्वच्छता अभियान, गोधन बचाव रथ, जल बचाव रथ, मतदान जागृती रथ, शोभा यात्रेचे व नागरीकांचे आकर्षण बनले होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी