31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक मनपाची झोळीत ६१ कोटी आणि ५८० कोटीची उड्डाणे

नाशिक मनपाची झोळीत ६१ कोटी आणि ५८० कोटीची उड्डाणे

महापालीकेचा सन २०२४ -२५ आर्थिक वर्षासाठी ६१.०३ कोटी आरंभीच्या शिल्लकेसह २६०३ कोटी जमेचे आणि २६०२. ४९ कोटी खर्चाचे मूळ अंदाजपत्रक सादर करण्यात येऊन ते मंजूर करण्यात आले . सध्या मनपाच्या गंगाजळीत अवघे ६१ कोटी रक्कम असताना आगामी वर्षात नवीन कामांसाठी ५३५ कोटीचा खर्च होणार असल्याने झोळी रिकामी आणि कोटींच्या कोटी उड्डाणे अशी अशी अवस्था मनपाची झाली आहे. आयुक्त तथा प्रशासक डॉ . अशोक करंजकर यांनी शुक्रवारी सन २०२४-२५ साठी २६०२.४५ कोटीचे अंदाजपत्रक विशेष महासभेत मांडले. त्यानंतर ते स्थायी समिती सभागृहात मंजूर केले.

महापालीकेचा सन २०२४ -२५ आर्थिक वर्षासाठी ६१.०३ कोटी आरंभीच्या शिल्लकेसह २६०३ कोटी जमेचे आणि २६०२. ४९ कोटी खर्चाचे मूळ अंदाजपत्रक सादर करण्यात येऊन ते मंजूर करण्यात आले . सध्या मनपाच्या गंगाजळीत अवघे ६१ कोटी रक्कम असताना आगामी वर्षात नवीन कामांसाठी ५३५ कोटीचा खर्च होणार असल्याने झोळी रिकामी आणि कोटींच्या कोटी उड्डाणे अशी अशी अवस्था मनपाची झाली आहे. आयुक्त तथा प्रशासक डॉ . अशोक करंजकर यांनी शुक्रवारी सन २०२४-२५ साठी २६०२.४५ कोटीचे अंदाजपत्रक विशेष महासभेत मांडले. त्यानंतर ते स्थायी समिती सभागृहात मंजूर केले.यावेळी मुख्य लेखाधिकारी दत्तात्रय पाथरूट , अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्यासह सर्व अधिकारी आणि विभागप्रमुख उपस्थित होते.

आगामी आर्थिक वर्षात मनपा उत्पन्न वाढीसाठी ज्या योजना प्रस्तावित आहेत त्यामध्ये बीओटी तत्वावर मनपाचे सहा ते सात भूखंड विकसित केले जाणार असून त्यामाध्यमातून १५० कोटीचा महसूल अपेक्षित आहे. आठ ते नऊ ठिकाणी पार्किंगचे आउटसोर्सिंग केले जाणार आहे. मनपा मिळकतींवर मोबाईल टॉवर लावले जाणार असून त्यामाध्यमातून पहिल्या वर्षी ८ कोटी तर शहरात सर्वत्र १५०० टॉवर मनपा मिळकतींवर लागले तर मनपाला आगामी काही वर्षात ३० कोटीचे उत्पन्न मिळणार असल्याचे आयुक्त म्हणाले. जीएसटी अनुदान, स्थानिक संस्था कर आणि १ टक्का मुद्रांक शुल्क अधिभार थकबाकीसह १४७२. ४९ कोटी उत्पन्न प्रस्तावित आहे. मालमत्ता कर आणि पाणीपट्टी विभागातून ३४८. १६ कोटींचे उत्पन्न प्रस्तावित आहे. जाहिरात आणि परवाना विभागतातून ४४. ५८ कोटी उतपन्न प्रस्तावित असून नगर नियोजन विभागातून २४४. ७३ कोटी उतपन्न प्रस्तावित आहे. मनपातर्फे गंगापूर रोड येथे दिव्यांग उद्यान सुरु केले जाणार आहे. मनपा क्षेत्रामंध्ये ७० मीटर पेक्षा जास्त उंच बांधकामाना परवानगी द्यावी लागणार असल्याने ३८ कोटी २६ लाख ७४ हजार रुपयांचे वाहन खरेदी केले जाणार आहे. स्मार्ट स्कुल प्रकल्पाअंतर्गत ८२ शाळा शाळा स्मार्ट करण्यात आल्या असून शिक्षण विभागासाठी १२. ३८ कोटी खर्च प्रस्तावित करण्यात आला आहे. ई गव्हर्नन्स साठी ६.२० कोटी खर्च प्रस्तावित आहे .तर स्वछतेसाठी १११. ९२ कोटी खर्च केला जाणार आहे .सार्वजनिक बांधकाम विभागासाठी ३४६.. ५७ कोटी खर्च प्रस्तावित आहे. फाळके स्मारकाच्या जागेवर रामोजी फिल्म सिटीच्या धर्तीवर विकास केला जाणार आहे.

छगन भुजबळांचे नाव अनावधानाने राहिले : आयुक्त् करंजकर
अंदाजपत्रकामधे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुखमंत्री अजित पवार, देवेन्द्र फडणवीस, आणि पालकमंत्री दादा भुसे याचे नाव आहे . मात्र माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांचे नाव नसल्याने त्यांचे नाव अनावधानाणे राहिले असे आयुक्त करंजकर म्हणाले..

नगर नियोजन खात्याची झाडाझडती
नगर नियोजन खात्याचे उत्पन्न का घटले याबाबत त्या विभागाची नेमकि काय कामे प्रलंबीत आहेत. त्यांची तपासणी नेमकी कोणाकडे आहे याचा आढावा घेतला जाईल तसेच नगरनियोजन विभागातील सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाईल असे आयुक्त म्हणाले.

सिहंस्थ साठी अवघे दहा कोटी
सिहंस्थ कुंभमेळा सन २०२६ मध्ये होणार आहे . त्यासाठी भरीव निधी अंदाजपत्रकात तरतूद करन्याची गरज होती .मात्र मनपाची आर्थिक स्थिती लक्षात घेता केवळ दहा कोटी रुपये सिहंस्थ निधीसाठी देण्यात आले आहेत .

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी