27 C
Mumbai
Sunday, September 8, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक मनपाच्या गाळे धारकांकडे 50 कोटींची थकबाकी

नाशिक मनपाच्या गाळे धारकांकडे 50 कोटींची थकबाकी

नाशिक महापालिकेला विकास कामांसाठी निधीची गरज असताना कोट्यावधी रुपये घरपट्टी, पाणीपट्टी वसुल होणे शिल्लक आहे. दुसरीकडे शहरातील महापालिकेच्या एकूण 2340 गाळे तसेच ओटे धारकांवर तब्बल 50 कोटींची थकबाकी असल्याचे समोर आले आहे. महापालिकेच्या कर विभागाने वसुलीला सुरुवात केली असून पैसे न भरणार्‍या थकबाकीदारांचे गाळे सील करण्यात येणार आहे. शहरातील सव सहा विभागासाठी एकूण 15 विशेष वसुली पथक तयार करण्यात आले असून तीन वेळा तगादा भेट दिल्यानंतर थेट गाळे सील करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.नाशिक महापालिका क्षेत्रात एकूण 1987 गाळे तर 353 ओटे आहे. मात्र त्यांच्याकडून वसुली सुरू झाली नसल्याने थकबाकीचा आकडा 50 काटींच्या घरात पोहोचला आहे.

नाशिक महापालिकेला विकास कामांसाठी निधीची गरज असताना कोट्यावधी रुपये घरपट्टी, पाणीपट्टी वसुल होणे शिल्लक आहे. दुसरीकडे शहरातील महापालिकेच्या एकूण 2340 गाळे तसेच ओटे धारकांवर तब्बल 50 कोटींची थकबाकी असल्याचे समोर आले आहे. महापालिकेच्या कर विभागाने वसुलीला सुरुवात केली असून पैसे न भरणार्‍या थकबाकीदारांचे गाळे सील करण्यात येणार आहे. शहरातील सव सहा विभागासाठी एकूण 15 विशेष वसुली पथक तयार करण्यात आले असून तीन वेळा तगादा भेट दिल्यानंतर थेट गाळे सील करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.नाशिक महापालिका क्षेत्रात एकूण 1987 गाळे तर 353 ओटे आहे. मात्र त्यांच्याकडून वसुली सुरू झाली नसल्याने थकबाकीचा आकडा 50 काटींच्या घरात पोहोचला आहे.महापालिकेचे सहा विभागात 62 व्यापारी संकुल असून त्यात एकूण 2340 गाळे व ओटे आहे. त्यातून दर महिन्याला मिळणारे भाडे महापालिकेच्या उत्पन्नाला हातभार लावते. सर्वाधिक थकबाकी नाशिक पश्चिम विभात विभागात आहे. दरम्यान मनपाने विशेष वसुली मोहीत हाती घेतली असून त्यासाठी 15 विशेष पथक तयार केले आहे. प्रत्येक पथकात एक प्रमुख अधिकारी व तीन सहाय्यक अधिकारी या प्रमाणे असून एका ठिकाणी तीन वेळा तगादा झाल्यानंतर गाळे किवा ओटे सील करण्याची कारवाई होणार आहे.

विभागनिहाय थकबाकी
नाशिक पश्चिम विभाग 29 कोटी 6 लाख
नवीन नाशिक 1 कोटी 39 लाख
पंचवटी 2 कोटी 53 लाख
नाशिकरोड 6 कोटी 59 लाख
सातपूर 5 कोटी 80 लाख
नाशिक पूर्व 7 कोटी 41 लाख
नाशिक महापालिकेने विशेष धडक वसुलीमुळे माहिती घेतली आहे. ज्या गाळेधारकांची किंवा ओटे धारकांची थकबाकी असेल त्यांनी महापालिकेच्या कर विभागाला सहकार्य करुन होणारी कारवाई टाळावी.
– श्रीकांत पवार, उपायुक्त कर, मनपा नाशिक

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी