27 C
Mumbai
Saturday, July 27, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशिक स्वराज्य सप्ताह” निमित्त राष्ट्रवादीची बाईक रॅली

नाशिक स्वराज्य सप्ताह” निमित्त राष्ट्रवादीची बाईक रॅली

राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीच्या वतीने “स्वराज्य सप्ताह” साजरा करण्यात येत असून त्यानिमित्ताने शहराध्यक्ष रंजन ठाकरे व युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली पाथर्डी फाटा ते सीबीएस मार्गे बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी संपूर्ण परिसर भगवामय झाला होता.राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार,पक्षाचे जेष्ठ नेते छगनरावजी भुजबळ, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे व मुंबई प्रदेशाध्यक्ष समीर भुजबळ यांच्या सूचनेनुसार युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शहरात “राज्य रयतेचे –जिजाऊच्या शिवबाचे” या शीर्षकाखाली दिनांक १२ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी पर्यंत “स्वराज्य सप्ताह” साजरा करण्यात येत आहे. महाराष्ट्राची अस्मिता व स्वाभिमान राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून जनतेसमोर मांडण्यासाठी पक्षाकडून आठवडाभर विविध उपक्रम राबविले जात आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या रयतेचे राज्य व त्यामधील संकल्पना लोकांसमोर मांडून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार शिवरायांच्या संकल्पनेतून शासन चालवण्याची प्रेरणा घेत असल्याचा उद्देश नगरिकांसमोर मांडण्यासाठी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने नागरिकांना त्रास न होता व वाहतुकीचा खोळंबा न होता सर्व फ्रंटल व सेलच्या पदाधिकाऱ्यानी बाईक रॅली काढून शहरातील वातावरण शिवमय केले.

यावेळी विष्णुपंत म्हैसधुणे, प्रदेश पदाधिकारी नानासाहेब महाले, निवृत्ती अरिंगळे, महिला शहराध्यक्ष योगिता आहेर, संजय खैरनार, प्रसाद सोनवणे, योगेश निसाळ, चेतन कासव, रोहित पाटील, ऐश्वर्या गायकवाड, आकाश कदम, नितीन चंद्रमोरे, बाळासाहेब गिते, मनोहर कोरडे, मकरंद सोमवंशी, प्रशांत वाघ, सुनिल अहिरे, नदीम शेख, जगदीश पवार, योगेश दिवे, नाना पवार, वजहत शेख, ज्ञानेश्वर महाजन, संदीप गांगुर्डे, संदीप खैरे, मुकेश शेवाळे, विशाल डोखे, हर्षल चव्हाण, रविंद्र शिंदे, अजय पाटील, अक्षय परदेशी, पुष्पा राठोड, रूपाली पठाडे, संगिता गांगुर्डे, संगिता चौधरी, वृषाली बच्छाव, पुष्पलता उदावंत, वर्षा लिंगायत, निर्मला सावंत, चैतन्य देशमुख, प्रथमेश पवार, रवींद्र शिंदे, कपिल काळे, सनिका गांगुर्डे, सोंजळ वाघ, शुभम गायकवाड, नितीन काळे, निलीमा काळे, पुष्पा वाघ आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी