31 C
Mumbai
Tuesday, May 21, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रम्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेला मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत करून नागरिकांना हस्तांतरित

म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेला मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत करून नागरिकांना हस्तांतरित

नागरिकांचे सहकार्य आणि शुभेच्छा पाठीशी राहिल्यास अजूनही चांगले काम करण्याची ऊर्जा मिळणार असल्याचे प्रतिपादन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक (sandip karnik) यांनी व्यक्त केले. म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या ( Mhasrul police station ) हद्दीतून चोरीस गेलेला मुद्देमाल ( Stolen goods ) पोलिसांनी हस्तगत करून नागरिकांना हस्तांतरित करण्याच्या कार्यक्रम प्रसंगी काढले. या कार्यक्रमामध्ये २८ नागरिकांना दागिने, चारचाकी वाहन, मोबाईल, दुचाकी असा चोरीला गेलेला तब्बल १४ लाख ५५ हजार ५८४ रुपयांचा मुद्देमाल हस्तांतरित करण्यात आला. या कार्यक्रमास पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे हे उपस्थित होते.(Police recovered stolen items from Mhasrul police station limits and handed them over to citizens.)

म्हसरूळ पोलीस ठाण्यात मुद्देमाल हस्तांतरण कार्यक्रमाचे आयोजन बुधवार दि. १० रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले होते. यावेळी पुढे बोलताना पोलीस आयुक्त कर्णिक म्हणाले की, म्हसरूळ पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांची वानवा असताना देखील चांगले काम केले जात आहे. नागरिकांच्या शुभेच्छा पाठीशी असल्यास काम करणे पोलीस दलाला सोपे होते. आणि पोलिसांचा उत्साह वाढून संशयिताला शिक्षा लागेपर्यंत काम करण्यास ऊर्जा मिळत असल्याचे सांगत त्यांनी नागरिकांचे आभार मानले. यावेळी पुणे जिल्ह्यातील परंदवाडी येथील गंगा माता वाहन शोध संस्थेचे राम उदावंत यांच्यासह पोलीस कर्मचारी बाळासाहेब मुर्तडक,उज्ज्वला शिंदे, जिजा भुसारे, वाल्मिक खैरनार या कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच, २८ नागरिकांना ४ लाख ९ हजार ५८४ रुपयांचे सोन्याचे दागिने, ४ लाख ९८ हजार रुपये किंमतीच्या १९ दुचाकी, १ लाख १५ हजार रुपयांचे ५ मोबाईल असा एकूण १४ लाख २२ हजार ५८४ रुपयांचा मुद्देमाल हस्तांतरित करण्यात आला. तसेच, २८ नागरिकांना ४ लाख ९ हजार ५८४ रुपयांचे सोन्याचे दागिने, ४ लाख ९८ हजार रुपये किंमतीच्या १९ दुचाकी, १ लाख १५ हजार रुपयांचे ५ मोबाईल असा एकूण १४ लाख २२ हजार ५८४ रुपयांचा मुद्देमाल हस्तांतरित करण्यात आला.

या कार्यक्रमाचे प्रास्तविक आणि आभार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे यांनी तर सूत्रसंचालन पोलीस उपनिरीक्षक दीपक पटारे यांनी केले. कार्यक्रमास म्हसरूळ पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तसेच मुद्देमाल घेण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमास म्हसरूळ पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तसेच मुद्देमाल घेण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी