28 C
Mumbai
Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रअहिल्यादेवी होळकर यांच्या २९९ व्या जयंती निमित्त सिडकोत रथयात्रा व विविध कार्यक्रम

अहिल्यादेवी होळकर यांच्या २९९ व्या जयंती निमित्त सिडकोत रथयात्रा व विविध कार्यक्रम

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९९ व्या जयंती निमित्त शुक्रवार दिनांक ३१ मे रोजी सिडकोत पवननगर स्टेडीयम येथे रथयात्रा व विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.अहिल्यादेवी होळकर ह्या छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच कर्तव्य कठोर राज्यकर्त्या होत्या. त्यांचे कार्य महिलांनी प्रेरणा घ्यावी असेच आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी उत्तम राज्य कारभाराचा आदर्श घालून दिला आहे.पुण्यश्लोक अहिल्यादेवीनी आपल्या कार्याच्या माध्यमातून हिंदवी स्वराज्याचा विस्तार संपूर्ण देशभर केला. न्यायप्रिय शासन व्यवस्था उभारून सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचे काम केले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर (Ahilyadevi Holkar) यांच्या २९९ व्या जयंती ( 299th birth anniversary) निमित्त शुक्रवार दिनांक ३१ मे रोजी सिडकोत पवननगर स्टेडीयम येथे रथयात्रा व विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.अहिल्यादेवी होळकर (Ahilyadevi Holkar) ह्या छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच कर्तव्य कठोर राज्यकर्त्या होत्या. त्यांचे कार्य महिलांनी प्रेरणा घ्यावी असेच आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी (Ahilyadevi Holkar) यांनी उत्तम राज्य कारभाराचा आदर्श घालून दिला आहे.पुण्यश्लोक अहिल्यादेवीनी(Ahilyadevi Holkar) आपल्या कार्याच्या माध्यमातून हिंदवी स्वराज्याचा विस्तार संपूर्ण देशभर केला. न्यायप्रिय शासन व्यवस्था उभारून सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचे काम केले.(Rath Yatra and various programmes to mark 299th birth anniversary of Ahilyadevi Holkar)

अहिल्यादेवी होळकर (Ahilyadevi Holkar) यांचे राज्य परिवर्तनवादी व पुरोगामी होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी त्या काळात न्यायप्रिय शासन व्यवस्था निर्माण केली.त्यांनी राज्यात पायाभूत सुविधा निर्माण करण्याबरोबरच हुंडाबंदी, मद्यबंदी बाबत जागृतीचे काम केले. देशभरातील विविध मंदिरांचा जीर्णोद्धार केला. अहिल्यादेवी यांचे काम आणि कर्तृत्व खूप मोठे होते. सर्वसामान्यांसाठी त्यांनी केलेला त्याग सर्वश्रुत आहे. त्या काळात जमीन महसूल, शेतसारा, चलन व्यवस्था, डाकसेवा यासारख्या व्यवस्था त्यांनी उभारल्या. शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांच्या हितासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. अहिल्यादेवींनी वीं घाट बांधणे, विहिरी, तलाव, मंदिरे यांचे बांधकाम करून चांगले उपक्रम
राबवून समाजकार्य केले. बांधलेली मंदिरे सुरक्षित ठेवण्यासह समाजोन्नतीसाठी प्रयत्न केले असून त्यांचा आदर्श ठेवायला हवा. अहिल्यादेवी होळकर (Ahilyadevi Holkar) यांनी आपल्या कार्यकाळात अनेक समाजोपयोगी, लोकहिताची कामे केली असून शिस्तप्रिय,कर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी अनेक लढाया जिंकल्या होत्या.

पवननगर स्टेडीयम येथून दुपारी ४ वाजता पारंपारिक वाद्यामध्ये शोभायात्रा काढण्यात येणार आहे. शोभायात्रा जैन हॉस्पिटल, कृष्णा साडी सेंटर, जिएसटी भवन, दिव्या ॲडलॅब, सावतानगर, रायगड चौक, आहिल्यादेवी स्मारक पवननगर येथून स्टेडीयम येथे समारोप होणार आहे. त्या नंतर रात्री साडे आठ वाजता राजमातेची महाआरती होणार आहे. सोलापुर येथील प्रा . गोविंद काळे यांचे रात्री ९ वाजता अहिल्यादेवी मातेचा इतिहास वावर यावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे .
कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रमाता पुण्यश्लोक प्रतिष्ठान व सकल धनगर समाजाने केले आहे .

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी