27.8 C
Mumbai
Saturday, May 4, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रअनेक वर्षांची परंपरा असलेला वडांगळी येथील संदल उत्साहात

अनेक वर्षांची परंपरा असलेला वडांगळी येथील संदल उत्साहात

सालाबाद प्रमाणे या वर्षी सुद्धा वडागळी येथे दावल मलिक बाबांचा संदल आणि भव्य चादर मिरवणूकीचा कार्यक्रम धूमधडाक्यात साजरा झाला.दर वर्षी एप्रिल महिन्यात हा उरूस साजरा केला जातो. वडांगळी आणि परिसरातील सर्व जातीधर्माचे लोक यासंदल मध्ये सहभागी झाले होते.यंदा मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस नितीन ठाकरे, मा.आमदार राजाभाऊ वाजे,राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस अर्जुन टिळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष नगरसेवक गोकुळ नाना पिंगळे,शिवसेना संपर्क प्रमुख दत्ता गायकवाड, माजी नगरसेवक मनोहर बोऱ्हाडे, अनिल चौघुले,नाशिक म. न. पा. चे शिक्षण सभापती बाबुराव आढाव

सालाबाद प्रमाणे या वर्षी सुद्धा वडागळी येथे दावल मलिक बाबांचा संदल ( Sandal) आणि भव्य चादर मिरवणूकीचा कार्यक्रम धूमधडाक्यात साजरा झाला.दर वर्षी एप्रिल महिन्यात हा उरूस साजरा केला जातो. वडांगळी आणि परिसरातील सर्व जातीधर्माचे लोक यासंदल मध्ये सहभागी झाले होते.यंदा मराठा विद्या प्रसारक समाजाचे सरचिटणीस नितीन ठाकरे, मा.आमदार राजाभाऊ वाजे,राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश सरचिटणीस अर्जुन टिळे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष नगरसेवक गोकुळ नाना पिंगळे,शिवसेना संपर्क प्रमुख दत्ता गायकवाड, माजी नगरसेवक मनोहर बोऱ्हाडे, अनिल चौघुले,नाशिक म. न. पा. चे शिक्षण सभापती बाबुराव आढाव (Sandal in Vadangali, a tradition of many years, is in full swing)

जनलक्ष्मी बँकेचे संचालक रत्नाकर गायकवाड, शिवसेना जिल्हा उपप्रमुख देवानंद बिरारी,डॉ. झाकीर शेख, भारत कोकाटे आदींच्या हस्ते विधिवत पूजा करून आणि श्रीफळ अर्पण करून मिरवणूकीला सुरवात करण्यात आली.
बीड जिल्ह्यातील मुखेड येथील गुरुकृपा ब्रास बँड आणि या वर्षीचं विशेष आकर्षण म्हणजे नाशिक येथील नाशिक महिला ढोल पथक यांनी वडागळी करांचे मन जिंकून घेतले. सहा वाजता चालू झालेली मिरवनुक रात्री अकरा वाजेपर्यंत चालली. संदल मध्ये अडीच ते तीन हजार लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

अशी जोपासली धर्मनिरपेक्षता
या मिरवणूकीच खास वैशिस्ट म्हणजे संपूर्ण मिरवणूकित धर्मनिरपेक्षता जोपसण्यासाठी डॉ. झाकीर भाई यांच्या संकल्पनेतून सर्वाना भगव्या टोप्या आणि भगव्या झेंड्याचा वापर करून वडागळीतील हिंदू मुस्लिम आज पण बंधू भावा प्रमाणेच राहात असल्याचा पुरावा दिला गेला.
या कार्यक्रमास रामदास खुळे,नवनाथ मुरडनर, सुदेश खुळे, योगेश घोटेकर, अरुण भुसे, भागवत थोरात, सुनील मोरे, दिलीप पालवे, नितीन कर्पे, ज्ञानेश्वर बनकर, उमेश खुळे,बाळा खुळे, दाऊ खुळे, शशिकांत खुळे,राजू खुळे, विक्रम भास्कर खुळे, अशोक खुळे, राजू सुके, केशव भोकनळ, दत्ता भोकनळ, गिरीश आप्पा खुळे, मंगेश देसाई, विजूशेठ कुलथे, बापू कुलथे, प्रवीण कदम, कैलास आण्णा खुळे, दत्तू आण्णा खुळे,सलीम पठाण आदिसह हजारो ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संदल कमिटीचे विकास बकरे, सचिन कुलथे, संजय वाघमारे, रफिक शेख, सोनू पटेल, अल्लाउदीन शेख,मुन्ना शेख, शौकत मणियार, भैया मणियार, लियाकत मणियार पंकज कुलथे, लाला शेख, साजिद शेख, राजू पटेल, कुणाल खुळे, बब्बू शेख, गणेश कडवे, विष्णू थोरात, अनस शेख, यासिर शेख, इम्रान शेख, लखन शेख, पप्पू शेख, विक्रम खुळे,अन्सार शेख, फारूक शेख, वसीम शेख, रहेमान शेख, सुरेश कहांडळ, सुका अढागळे, अविनाश अढागळे, सुभाष रणदिवे, पपू बकरे आदी उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी