31 C
Mumbai
Thursday, December 5, 2024
Homeव्हिडीओपंतप्रधान व्यासपीठावर आले, अन् नरेंद्र मोदींचं चालू भाषण थांबवलं

पंतप्रधान व्यासपीठावर आले, अन् नरेंद्र मोदींचं चालू भाषण थांबवलं

नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान आहेत, असं असताना पंतप्रधान यांनी नरेंद्र मोदींचं भाषण थांबवलं, असं कसं होईल. त्यावेळी देशाचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी होते. उप पंतप्रधान लालकृष्ण अडवाणी होते. आणि या दोघांचे ब्लू एड बॉय होते आपला मराठमोळा माणूस प्रमोद महाजन. एनडीएचे घटक असलेले जॉर्ज फर्नांडीस हे सुद्धा त्यावेळचं मोठं व्यक्तिमत्व होतं.

नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान आहेत, असं असताना पंतप्रधान यांनी नरेंद्र मोदींचं भाषण थांबवलं(stopped Narendra Modi’s ongoing speech) असं कसं होईल. त्यावेळी देशाचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी होते. उप पंतप्रधान लालकृष्ण अडवाणी होते. आणि या दोघांचे ब्लू एड बॉय होते आपला मराठमोळा माणूस प्रमोद महाजन. एनडीएचे घटक असलेले जॉर्ज फर्नांडीस हे सुद्धा त्यावेळचं मोठं व्यक्तिमत्व होतं. महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडे हे भाजपचे नेते होते. महाराष्ट्रात शिवसेना आणि देशात भाजप असं या दोन्ही पक्षांच ठरलेलं होतं. बाळासाहेब ठाकरे यांचा शब्द युतीमध्ये अंतिम मानला जायचा. किंबहूना अटलबिहारी वाजपेयी व लालकृष्ण आडवाणी या भाजपच्या सर्वोच्च नेत्यांवर सुद्धा बाळासाहेब ठाकरे यांची आदरयुक्त वचक होती. बाळासाहेबांचा शब्द हा अटलबिहारी वाजपेयी व आडवाणी यांना अंतिम मानवा लागायचा. आताच्या सारखी तेव्हा राजकारणा घाण आलेली नव्हती. राजकारणात बऱ्यापैकी स्वच्छता होती. आता ज्यांनी अख्खा देश हादरवून ठेवला आहे, ते नरेंद्र मोदी तेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते. अन् भाजपच्या वरिष्ठ गोटात त्यांना फार किंमत नव्हती. किंबहूना नरेंद्र मोदी म्हणजे भाजपसाठी डोकेदुखी होते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या मनातून नरेंद्र मोदी तेव्हा पुरते उतरलेले होते. नरेंद्र मोदी ही अटलबिहारी वाजपेयींसाठी ‘ब्याद’ किवा ‘डोकेदुखी’ ठरलेले होते. कारण नरेंद्र मोदींमुळे देशाची अख्ख्या जगात नाचक्की झाल्याचे अटलबिहारी वाजपेयींचं मत होतं. किंबहूना नरेंद्र मोदी यांना मुख्यमंत्रीपदावरून हटविण्याच्या सुचना त्यांनी त्यावेळी लालकृष्ण आडवाणी यांनी केल्या होत्या. पण आडवाणी, प्रमोद महाजन यांनी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या बाळासाहेब ठाकरे यांनी नरेंद्र मोदींना त्यावेळी वाचवलं होतं. अटलबिहारी वाजपेयींचा नरेंद्र मोदींवर इतका अमाप राग का होता. त्याचं कारणही तसंच, त्यावेळी नुकत्याच गुजरातमध्ये दंगली झाल्या होत्या. त्या अगोदर रेल्वे जाळण्याची घटना घडली होती. अयोध्येवरून कारसेवक परत येत होते. ही ट्रेन गुजरातमधील गोध्रा या रेल्वे स्थानकावर आली तेव्हा ती जाळण्यात आली. त्यात रेल्वेचे काही डबे जळाले. दुर्देवाने त्यात बिचाऱ्या निष्पाप कारसेवकांचेही बळी गेले. ते दुष्कृत्य कुणाचं होतं, त्यावर रेल्वेमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याचं एक अनुमान आहे. तर दुसरं अनुमान हे पाकिस्तानच्या आयएएसनं हे कृत्य घडवून आणलं असं आहे. जास्त शक्यता ही आयएसआयचीच आहे. ही घटना खूपच वाईट होती. पण या घटनेचं पर्यवसन भलत्याच पद्धतीने झालं. गोध्रा परिसरात मुस्लीम लोकसंख्या आहे. सामान्य माणसांच आयुष्य ते जगायचे. पण काही समाजकंटकांनी दंगल घडवून आणली.

संपूर्ण व्हिडिओ पहा आमच्या लय भारी वेबसाईट लिंक वर

Latest Marathi News | Breaking News in Marathi | Live News in Marathi | Marathi News Headlines | laybhari.com

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी