30 C
Mumbai
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रपुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची २९९वी जयंती हर्षोउल्लासात साजरी

पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची २९९वी जयंती हर्षोउल्लासात साजरी

हिंदू धर्म रक्षक पु.अहिल्यादेवी होळकर ‌सार्वजनिक उत्सव समिती ‌तर्फे अहिल्यादेवी होळकरांची‌ २९९वी‌ जयंती प्रबोधनात्मक आगळ्या वेगळ्या पद्धतीने ‌दिनांक३१मे रोजी ‌साजरी करण्यात आली. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर‌ हिंदू धर्म ‌रक्षणासाठी उल्लेखनीय काम पु.अहिल्यादेवींचे आहे.मुगलांनी उद्ध्वस्त केलेली अनेक मंदिरे तसेच बारा ज्योतिर्लिंगांचा जिर्णोद्धार ‌त्यांनी आपल्या खाजगी मालमत्तेमधून केला.रयतेच्या, यात्रेकरूंच्या, शेतकऱ्यांच्या सोयीसाठी त्यांनी अनेक ठिकाणी विहीरी, तलाव,बारवा,घाट, रस्ते बांधले.मंदिरातील दिवाबत्ती साठी त्यांनी वर्षाने लावून ‌दिले,जमिनी दिल्या.नाशिक येथील गोदावरी काठावरील काशी विश्वेश्वराचे मंदिर, अहिल्या रामाचे मंदिर, अहिल्या घाट, त्र्यंबकेश्वर ‌येथील कुशावर्त चांदवड येथील रंगमहाल रेणुका माता मंदिर हे त्यांच्याच धर्माश्रयातून झाले.

हिंदू धर्म रक्षक पु.अहिल्यादेवी होळकर (Punyashlok Rajmata Ahilyadevi Holkar) ‌सार्वजनिक उत्सव समिती ‌तर्फे अहिल्यादेवी होळकरांची‌ (Punyashlok Rajmata Ahilyadevi Holkar) २९९वी‌ जयंती प्रबोधनात्मक आगळ्या वेगळ्या पद्धतीने ‌दिनांक३१मे रोजी ‌साजरी करण्यात आली. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर‌ हिंदू धर्म ‌रक्षणासाठी उल्लेखनीय काम पु.अहिल्यादेवींचे (Punyashlok Rajmata Ahilyadevi Holkar) आहे.मुगलांनी उद्ध्वस्त केलेली अनेक मंदिरे तसेच बारा ज्योतिर्लिंगांचा जिर्णोद्धार ‌त्यांनी आपल्या खाजगी मालमत्तेमधून केला.रयतेच्या, यात्रेकरूंच्या, शेतकऱ्यांच्या सोयीसाठी त्यांनी अनेक ठिकाणी विहीरी, तलाव,बारवा,घाट, रस्ते बांधले.मंदिरातील दिवाबत्ती साठी त्यांनी वर्षाने लावून ‌दिले,जमिनी दिल्या.नाशिक येथील गोदावरी काठावरील काशी विश्वेश्वराचे मंदिर, अहिल्या रामाचे मंदिर, अहिल्या घाट, त्र्यंबकेश्वर ‌येथील कुशावर्त चांदवड येथील रंगमहाल रेणुका माता मंदिर हे त्यांच्याच धर्माश्रयातून झाले.(The 299th birth anniversary of Punyashlok Rajmata Ahilyadevi Holkar was celebrated with joy)

त्यांनी काशी,सोरटी सोमनाथाचे व ईतर ज्योतिर्लिंगांचा जिर्णोद्धार करून मुघलांच्या राज्यात सुद्धा मुत्सद्दीपणे हिंदू धर्म टिकवला.

पु.अहिल्यादेवींचा (Punyashlok Rajmata Ahilyadevi Holkar) हा धर्मरक्षणाचा व समाजाभिमुख राज्यकारभाराचा दैदिप्यमान इतिहास जनतेपर्यंत पोहचविण्याचे कार्य पु.अहिल्यादेवी होळकर (Punyashlok Rajmata Ahilyadevi Holkar) सार्वजनिक जन्मोत्सव समिती मागील काही वर्षांपासून श्री.समाधान बागल यांच्या झपाटलेल्या कार्य शैलीच्या माध्यमातून करीत आहे. संपूर्ण नाशिक जिल्ह्यात मागील तीन वर्षापासून होळकर शही च्या पाऊलखुणा जागवूया असे अनेक सोहळे घेऊन नाशिक जिल्ह्यातील होळकर शाही च्या मातोश्रींनी केलेल्या कामाच्या ठिकाणी जाऊन सोहळ्या चे आयोजन करून इथे जागृत करण्याचे काम या समितीमार्फत करण्यात येत आहे मल्हारराव होळकर यांच्या जन्मापासून ते मातोश्री च्या पुण्यतिथी पर्यंत प्रत्येक दोन महिने ला 16 घेऊन हा नासिक जिल्ह्याचा होळकर इतिहास जागृत करण्याचे काम चालू आहे.

समितीने अहिल्यादेवी जयंती नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात पोहचवली.गावा गावात जयंती उत्सवासाठी मातोश्री अहिल्यादेवींच्या मुर्ती एक नारळ घेऊन उपलब्ध करून दिल्या.यावर्षी ५1 ठिकाणी मुर्ती (पुतळा)‌वाटप केले तर पुढील वर्षी अहिल्यादेवींच्या ३००व्या जयंती पर्यंत ३०० पुतळे(मुर्ती)वाटपाचा संकल्प श्री.समाधान बागल व समितीने केला आहे. यावर्षी वाटप केलेल्या ५1पुतळ्यांचे पूजन प्रतिकात्मक नारळांची पुजा करुन गंगा गोदावरी नदीच्या तीरी सर्व 51 ठिकाणचा सोहळा हा रामकुंड पंचवटी या ठिकाणी आगळा वेगळा करण्यात आला यामध्ये 51 जोडप्यांना नारळ देऊन त्यांची पूजाअर्चा करून नदीच्या तीरी सोडण्यात आली.

आजचा गोदा घाटावरील जयंती सोहळा अत्यंत विलोभनीय झाला. सोहळ्याची सुरुवात चांदवड येथील रंगमहाल इथे जाऊन मातोश्रींचे पूजा अर्चा करून रेणुका मातेचे दर्शन घेऊन त्या ठिकाणाहून सुरुवात केली या मध्ये संध्याकाळी रामकुंड पंचवटी अहिल्या घाट गंगा आरती व अहिल्या आरती अत्यंत विलोभनीय स्वरुपात करण्यात आली. फटाकांचा जल्लोष करण्यात आला. आरतीला महंत……तसेच‌ होळकर वंशाचे निफाड येथील वारसदार नानासाहेब होळकर, मुकुंद राजे होळकर, स्वप्निल राजे होळकर, इंदोर तसेच महंत,, साधुसंत सामाजिक कार्यातील व्यक्तिमत्व शैक्षणिक राजकीय व्यक्तिमत्व उपस्थित होते.नाशिक शहर‌ परीसरातील असंख्य अहिल्याप्रेमी सोहळ्यात सहभागी झाले होते.
तरुण प्रबोधनकार रामदास काळे यांचे होळकर शाहीच्या पाऊल खूणा या विषयावर व्याख्यान झाले. त्यांनी नाशिक जिल्ह्यात मातोश्रींचा इतिहास काय आहे रामकुंड पंचवटी या ठिकाणचा इतिहास काय आहे संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील होळकर शाई केलेल्या कामाचा आपल्या शैलीतून संपूर्ण रामकुंड वरती हजारो लोकसंख्या जमलेल्यांमध्ये इतिहासाचा जागर करण्यात आला हिंदू धर्म संस्कृतीचे‌ प्रतिक म्हणून उपस्थितांनी भगव्या टोप्या परीधान करून धर्मरक्षणाचा अहिल्यादेवींचा विचार पुढे घेऊन जाण्याचा निश्चय केला.
अहिल्या जयंतीचा योग‌ साधून समाजातील कर्तृत्ववान चार महिला महिलांना अहिल्या रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले श्री शोभाताई काळे श्री सतीश शुक्ला अध्यक्ष पुरोहित महासंघ, सौ.संगिताताई पाटील,सौ स्वाती गजभार. अथर्व ढगे यांना महेश्वरीचा देखावा निर्माण केल्यामुळे अहिल्यारत्न पुरस्काराने गौरवण्यात आले ,व ….. राजाभाऊ वाजे यांना मल्हार श्री पुरस्काराने गौरवण्यात आले, त्यांनी नाशिक जिल्ह्यातील प्रथमच सिन्नर येथे अहिल्यादेवी होळकरांचा स्मारक स्वखर्चाने बसून जिल्ह्यातील एक आदर्श निर्माण करून दिला .

सोहळ्या ची प्रास्तविक समाधान बागल, यांनी केले अध्यक्ष शाम गोसावी यांनी अनोमदन दिले.कार्यक्रमाला जेष्ठ समाजसेवक श्री.. देविदास भडांगे, शशिकांत कोथमिरे, सदाशिव वाघ, दत्तू भाऊ बोडके विनायक काळदाते, गोरख भाऊ गाढे, दत्तू देवकर,शिवाजी ढगे ,भांड साहेब, सुभाष शिरोळे,विनोद ढोरे, आगवणे साहेब, सुनील पंडित, व श्री.अनिल पानसरे सर श्री.पळसकर दादा…… ई.उपस्थित होते.
जयंती सोहळा यशस्वी करण्यासाठी समितीचे अध्यक्ष श्याम गोसावी,मावळते अध्यक्ष बापू ढापसे,समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री.समाधान बागल, ज्ञानेश्वर ढेपले, उपाध्यक्ष देवराम रोकडे राजाभाऊ बादाड शिवाजी कार्याध्यक्ष ऋषिकेश कापसे कल्पेश शिंदे विजय काळदाते, स्वागत अध्यक्ष वैभव रोकडे, भूषण जाधव,अमोल गजभार प्रशांत बागल लक्ष्मणराव बर्गे, दीपक सूडके,राजू वर्पे,विशाल बागल अनुराग बागल, रोशन .सत्यम बागल,, डॉ.मोहंत कोथमिरे व तरुण मंडळीने योगदान दिले.आरती व‌ जयंती सोहळा ‌यशस्वी करण्यासाठी गंगा गोदावरी पुरोहित संघाचे‌ अध्यक्ष सतीश शुक्ला, यांनी सहकार्य लाभले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी