29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रयशवंत मंडईतील तेवीस गाळे होणार सील एक कोटी भाडे थकवले ; मनपा...

यशवंत मंडईतील तेवीस गाळे होणार सील एक कोटी भाडे थकवले ; मनपा करणार कारवाई

न्यायालयात यशवंत मंडईचा निकाल तेथील गाळे धारकांच्या विरोधात गेल्याने मनपा प्रशासनाचे हौसले बुलंद झाले आहे. तेथील तेवीस गाळेधारकांकडे मागील दहा वर्षांपासून तब्बल एक कोटी भाडे थकले आहे. त्यामुळे मनपा करसंकलन विभाग हे गाळे सील करणार आहे. तसेच लवकरच या इमारतीवर बुलडोजर देखील चालवला जाणार आहे. यशवंत मंडईची इमारत जीर्ण झाली असून ती कोसळण्याची भिती आहे. या अगोदर अनेक व्यावसायिकांनी गाळे खाली केले. मात्र नोटीस बजावूनही तेवीस भाडेकरुंनी गाळे खाली करण्यास नकार दिला. तसेच मागील काही वर्षांपासून भाडे देखील अदा केले नाही.

न्यायालयात यशवंत मंडईचा निकाल तेथील गाळे धारकांच्या विरोधात गेल्याने मनपा प्रशासनाचे हौसले बुलंद झाले आहे. तेथील तेवीस गाळेधारकांकडे मागील दहा वर्षांपासून तब्बल एक कोटी भाडे थकले आहे. त्यामुळे मनपा करसंकलन विभाग हे गाळे सील करणार आहे. तसेच लवकरच या इमारतीवर बुलडोजर देखील चालवला जाणार आहे.
यशवंत मंडईची इमारत जीर्ण झाली असून ती कोसळण्याची भिती आहे. या अगोदर अनेक व्यावसायिकांनी गाळे खाली केले. मात्र नोटीस बजावूनही तेवीस भाडेकरुंनी गाळे खाली करण्यास नकार दिला. तसेच मागील काही वर्षांपासून भाडे देखील अदा केले नाही.

चार महिन्यांपुर्वी मनपा कर संकलन विभागाने केलेल्या स्ट्रक्चरल आॅडिटमध्ये ही इमारत धोकेदायक असल्याचा निर्वाळा देण्यात आला. त्यामुळे व्यावसायिकांना गाळे खाली करण्याच्या सूचना देण्यात आल्या.परंतू त्यांनी त्यास विरोध करत मनपाच्या कारवाई विरोधात न्यायालयात धाव घेतली. मात्र दोन आठवड्यापुर्वी न्यायालयाने गाळे धारकांना दणका देत ही इमारत जीर्ण असून ती पाडण्यास ग्रीन सिग्नल दिला. त्यामुळे या धोकेदायक इमारतीवर बुलडोजर चालवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मनपा लवकरच इमारत पाडण्याची कारवाई करणार आहे.पण त्या अगोदर येथील तेवीस गाळे भाडेकरुकडून थकलेले एक कोटी भाडे वसूल करणार आहे. पुढिल दोन दिवसात गाळे सील करण्याची कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे गाळेधारकांना डबल दणका बसणार आहे.

बहुमजली पार्किंगचे नियोजन
रविवार कारंजा येथील यशवंत मंडईच्या जागेवर बहुमजली पार्किंग उभारण्याचे नियोजन आहे. या ठिकाणी पार्किंगची जागा नसल्याने वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. ते पाहता लवकरच ही इमारत पाडून बहुमजली पार्किग उभारण्याचे नियोजन सुरु आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी