33 C
Mumbai
Monday, April 22, 2024
Homeमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रपिंपळगाव बसवंत येथे वॉकथोन तर दिंडोरीत ईट राईट मिलेट मेळावा

पिंपळगाव बसवंत येथे वॉकथोन तर दिंडोरीत ईट राईट मिलेट मेळावा

भारतीय अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरणाच्या इट राईट इंडिया या महत्त्वाकांशी मोहीमे अंतर्गत पिंपळगाव बसवंत येथे उद्या १२ फेब्रुवारी रोजी ( सोमवारी) पहाटे साडेसहा वाजता केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत वॉकथोन होणार आहे .तसेच दुपारी साडेबारा वाजता जनता इंग्लिश स्कूल दिंडोरी येथे राईट मिलेट मेळावा चे आयोजन करण्यात आल्याचे भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरच्या क्षेत्रिय संचालक श्रीमती प्रीती चौधरी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.यावेळी उपसंचालक कृष्णा मेथेकर, सहाय्यक संचालक अमोल जगताप, अजय खैरनार उपस्थित होते.

प्रीती चौधरी यांनी या विषयी शाळेत जनजागृती होणे गरजेचे असून शालेय विद्यार्थी हे पुढचे ग्राहक आहेत. भरड धान्याची कमी निर्मिती होत असल्याने उत्पादन वाढविण्यासाठी देखील शासनस्तरावर अनेक प्रयत्न सुरू आहेत. शहरात पोषक धान्याला मोठी मागणी असल्याने उत्पादनात वाढ होणे गरजेचे आहे. या जनजागृती मोहिमेसाठी शाळा महाविद्यालयातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून बाराशेहून जास्त प्रवेशिका आल्याचे चौधरी यांनी सांगितले. पिंपळगाव येथे होणाऱ्या कार्यक्रमात पाच हजारहुन अधिक लोक सहभागी होणार आहेत. या वॉकथोनची पहाटे ६. ३० वाजता के के वाघ महाविद्यालय पिंपळगाव बसवंत येथून केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते ऑनलाईन हिरवा झेंडा दाखवून होईल . त्यानंतर निफाड फाटा महावीर चौक चंदन गुरुकुल मार्गे वाकोथान केके वाघ महाविद्यालयात वॉकथोन परत येईल. दुपारी साडेबारा वाजता जनता इंग्लिश स्कूल दिंडोरी येथे राईट मिलेट मेळाव्याचे उद्घाटन केले जाईल. स्टॉल निरीक्षण, विविध स्पर्धेत विजयि विजेत्यांना पारितोषिक वितरण आणि पाहुण्यांच्या मार्गदर्शनाने कार्यक्रमाची सांगता होईल. सुरक्षित आणि निरोगी अन्नपद्धती अंगिकारण्यासाठी वॉकथोन तसेच मेळाव्यात सहभागी व्हावे असे आवाहन प्रीती चौधरी यांनी जिल्हावासीयांना केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी