29 C
Mumbai
Sunday, December 10, 2023
घरक्रिकेटपाकिस्तानकडून श्रीलंकेचा दारुण पराभव; 345 धावसंख्येचा पाठलाग यशस्वी

पाकिस्तानकडून श्रीलंकेचा दारुण पराभव; 345 धावसंख्येचा पाठलाग यशस्वी

आयसीसी क्रिकेट वनडे विश्वचषक 2023 श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान या संघांचा (10 ऑक्टोबर) या दिवशी दुसरा सामना पार पडला. या सामन्यात श्रीलंकेने टॉस जिंकून सर्वप्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. श्रीलंकेने फलंदाजीचा निर्णय घेत चांगली फलंदाजी केली. 9 गडी गमावत लंकेने 345 धावांचा डोंगर उभा केला. हाच डोंगर आता पाकिस्तान संघ सर करेल का? याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले होते. मात्र क्रिकेटच्या 48 वर्षातील पाकिस्तानचा हा विजय सुवर्ण अक्षरात लिहिला जाईल. यावेळी पाकिस्तान संघाकडून रिझवान आणि शफिक यांनी मोलाची साथ दिली आहे.

रिझवान आणि शफिकची मोलाची साथ 

धावांचा पाठलाग करत असताना पाकिस्तानची सुरुवात ही धिम्या गतीने झाली होती. यावेळी इमाम उल हक आणि बाबर आझम यांना फारशी कामगिरी करता आली नाही. हे दोघेही स्वस्तात बाद झाले. यावेळी अब्दुल्ला शफिक आणि मोहम्मद रिझवान यांनी डाव सावरत द्विशतकी भागीदारी केली. शाफिकने (103) चेंडूत 113 धावा करत शतकी खेळी केली. तर मोहम्मद रिझवानने 121 चेंडूत (131) धावा करत दमदार शतकी खेळी करत नाबाद राहिला. शफिक याने (103) चेंडूत (10) चौकार आणि (3) षटकार लगावले. तर मोहम्मद रिझवान याने (8) चौकार आणि (3) षटकार लगावले आहेत.

हेही वाचा

शुभमन गिल पाकिस्तानविरुद्ध खेळणार?

वर्ल्ड कप 2023 अपडेट्स: जाणून घ्या क्रिकेटच्या ताज्या अपडेट्स!

शुभमन गिलला डेंग्यू झाल्याने वर्ल्ड कप खेळणार का? राहुल द्रविडने स्पष्ट सांगितले..

श्रीलंकेचे गोलंदाज अयशस्वी

मोठी धावसंख्या करूनही श्रीलंकेच्या कोणत्याही गोलंदाजाला म्हणावी अशी कामगिरी करता आली नाही. महीश थीक्षाना आणि मथीशा पथिराना यांनी केवळ 1-1 गडी बाद केले. तर दिलशानने केवळ 2 गडी बाद केले. तर इतर कोणत्याही गोलंदाजांनी विक्रमी कामगिरी केली नाही. यामुळे लंकेच्या समरविक्रमा आणि मेंडिसने केलेले शतक निष्फळ ठरले आहे.

पाकिस्तान संघ

बाबर आझम (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी आणि हरिस रौफ.

श्रीलंका संघ

दासुन शनाका (कॅप्टन), पाथुम निसांका, कुसल परेरा, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा, चारिथ असलंका, धनंजया डी सिल्वा, दुनिथ वेललागे, महेश थेक्षाना, मथीशा पाथिराना आणि दिलशान मधुशंका.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी