33 C
Mumbai
Saturday, May 18, 2024
Homeक्रिकेटशुभमन गिल पाकिस्तानविरुद्ध खेळणार?

शुभमन गिल पाकिस्तानविरुद्ध खेळणार?

देशात सध्या आयसीसी एकदिवसीय वर्ल्डकपची धूम सुरू आहे. या वर्ल्डकपमध्ये तब्बल 10 देशांचे क्रिकेट संघ सहभागी झाले आहेत. याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. यापैकी अधिक चर्चा ही भारत आणि पाकिस्तान या सामन्याची होणार आहे. यापूर्वी भारत आणि अफगाणिस्तान हे संघ एकमेकांविरुद्ध भिडतील. मात्र या सामन्यात सध्या चर्चेत असलेला खेळाडू शुभमन गिल सामन्यात असणार का? याबाबत माहिती समोर आली आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी लढत झाली. यावेळी आजारी असल्याने शुभमन गिल खेळला नव्हता. पण आता गिलची प्रकृती आखणी बिघडल्याने तो भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यात नसेल हे नक्की झाले आहे.

2023 च्या एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये रविवारी भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत केले. यानंतर तरी शुभमन खेळायला येईल असे वाटले होते. पण शुभमनच्या प्रकृतीत अधिक बिघड झाल्याने पुढील काही सामने तो खेळण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे तो १४ ऑक्टोबरला अहमदामधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात देखील खेळणार नसल्याची माहिती समोर आली आहे. त्याला डेंग्यू झाला असल्याची माहिती बीसीसीआयने ट्वीट करत  समोर आणलीय. तर 10 ऑक्टोबरला सकाळी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही वेळानंतर पुन्हा त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता त्याने विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिल्याचे ट्वीट पीटीआय”ने केले आहे.

हेही वाचा 

वर्ल्ड कप 2023 अपडेट्स: जाणून घ्या क्रिकेटच्या ताज्या अपडेट्स!

क्रिकेट विश्व चषक स्पर्धेतील वेगवान शतक, ‘या’ खेळाडूने केली किमया !

मोदी स्टेडियम बनले सुरक्षा छावणी, लक्ष भारत-पाकिस्तान लढतीकडे

शुभमन गिलऐवजी इशान किशनला संधी  

11 ऑक्टोबरला भारताचा सामना हा अफगाणिस्तानविरुद्ध असणार आहे. त्यानंतर 14 ऑक्टोबरला भारत विरुद्ध पाकिस्तान असा ऐतिहासिक सामना होणार आहे. भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत. आणि नेमक्या या सामन्यात शुभमन गिल खेळणार नाही. यामुळे टीम इंडियाची डोकेदुखी वाढली आहे. या दोन्ही संघाविरुद्ध भारताला सामोरे जावे लागणार असून शुभमन गिलऐवजी इशान किशनला संघात संधी दिली आहे. त्यामुळे शुभमनशिवाय टीम इंडिया पाकिस्तानला कशी सामोरे जाणार, हे पाहावे लागेल.

भारतीय संघ 

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार ), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, रविचंद्रन अश्विन, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी