33 C
Mumbai
Sunday, May 12, 2024
Homeमहाराष्ट्रPetrol Price Today: पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जाहीर, जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचा...

Petrol Price Today: पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जाहीर, जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव

टीम लय भारी

नवी दिल्ली: देशातील सरकारी पेट्रोलियम कंपन्यांनी (IOCL) आज मंगळवारी (9 नोव्हेंबर) पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर (पेट्रोल-डिझेल आजचे दर) जाहीर केले(Petroleum companies announce new fuel rates)

आजही इंधनाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. देशभरात सलग तिसऱ्या दिवशी इंधनाचे दर स्थिर आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांना तात्पुरता का होईना पण दिलासा मिळाला आहे.

किरिट सोमय्यांच्या विरोधात सिव्हिल आणि क्रिमिनल याचिका दाखल! : अतुल लोंढे

नेटफ्लिक्स आयफोन यूजर्ससाठी अॅप स्टोअरवर सादर करणार गेमिंग अॅप, जाणून घ्या काय आहे कारण

पेट्रोलियम कंपन्यांनी मंगळवारी सकाळी जाहीर केलेल्या दरांनुसार, दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 104.01 रुपये आणि डिझेलची किंमत 86.71 रुपये प्रति लिटर आहे. तर मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 109.96 आणि 94.13 रुपये प्रतिलीटर इतका आहे.

महाराष्ट्रात पेट्रोल स्वस्त होण्याची शक्यता

केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी करामध्ये कपात केल्यानंतर आता महाराष्ट्रातही इंधन स्वस्त होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, राज्य सरकारकडून पेट्रोलच्या दरात दोन रुपयांची कपात केली जाऊ शकते.

परमबीर सिंह यांच्याविरोधातील खंडणी प्रकरण : दोन पोलीस निरीक्षकांना अटक

Petrol, diesel prices today: Rates constant on 09 November, check here what you need to pay in your city

यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किती कपात होणार, याचे चित्र स्पष्ट होईल. इंधन दरात कपात झाल्यास राज्यातील सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.

यापूर्वी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात अनुक्रमे 5 रुपये आणि 10 रुपयांची कपात केली होती. त्यानंतर अनेक राज्यांनी इंधनावरील व्हॅट कमी करत आपापल्या राज्यातील जनतेला आणखी स्वस्तात इंधन उपलब्ध करुन दिले होते. त्यामुळे महाराष्ट्र सरकारही इंधन दरकपातीचा निर्णय कधी घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

दररोज 6 वाजता बदलतात किमती

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.

असे तपासा पेट्रोल आणि डिझेलचे भाव

आपण एसएमएसच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकता. पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. इंडियन ऑइलच्या वेबासाइटनुसार, RSP बरोबर आपल्या शहराचा कोड टाइप करून 9224992249 नंबरवर SMS पाठवावा लागणार आहे. या शहराचा कोड वेगवेगळा असतो. बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरवर मेसेज पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकतात.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी