29 C
Mumbai
Monday, July 1, 2024
Homeमहाराष्ट्रमराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज

मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज

जालना जिल्ह्यातील अंतर्वली गावात मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे शिंदे-फडवीस-पवार या महायुतीच्या सरकारचा जोरदार निषेध आंदोलकांकडून करण्यात येत आहे. गेल्या 29 ऑगस्ट रोजीपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील काही कार्यकर्त्यांसोबत उपोषणाला बसले होते. आंदोलकांनी जेथे मंडप उभारला होता त्या मंडपात पोलिसांनी लाठीचार्ज केला.

गेले अनेक वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यातील मराठा समाज आग्रही आहे. सरकारकडून आरक्षण देण्याची केवळ आश्वासने दिली जात असून त्यावर ठोस कार्यवाही होत नसल्याने मराठा समाज नाराज आहे. अंतर्वली गावातील मनोज जरांगे पाटील यांनी काही सहकाऱ्यांसोबत आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषण सुरु केले होते. दरम्यान जरांगे यांची तब्बेत खालावली. त्यांनी उपोषण मागे घ्यावी अशी विनंती त्यांना करण्यात आली होती. मात्र जरांगे यांनी उपोषण सुरुच ठेवले होते.

दरम्यान आज आंदोलनस्थळी जेथे मंडप घातला होता तेथे पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर लाठी चार्ज केला. आंदोलकांनी दगडफेक केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. आंदोलनस्थळी मुले, महिला यांच्यावर देखील पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. आता आम्ही शांत का बसायचे असा सवाल देखील आंदोलकांनी सरकारला केला आहे.

हे सुद्धा वाचा 
सरपंचाने स्वतःची जमीन पडीक ठेवून गावाला दिलं पाणी
मल्लिकार्जुन खरगे यांना वंचितचे खुले पत्र!
शरद पवारांनंतर माझा नंबर लागतो : मल्लिकार्जून खर्गे

दरम्यान पोलिसांच्या लाठीचार्ज नंतर संतप्त आंदोलकांकडून धुळे-सोलापूर मार्गावर वाहनांची जाळपोळ सुरु केली. आम्ही शांततेत आंदोलन करत असताना देखील पोलिसांकडून आंदोलकांवर जबर लाठीचार्ज करण्यात आल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. जरांगे पाटील म्हणाले आम्ही शांततेत आंदोलन करत होतो. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमचे बोलणे झाले. आज कोणीतरी खाडे नावाचा व्यक्ती आला, त्याने मला उपचार घेण्यासंदर्भात सांगितले, मी त्याला होकार दिला. मात्र पोलिसांना आंदोलन मोडून काढायचे आहे. माझे आंदोलकांना आवाहन आहे की, जाळपोळ, तोडफोड करु नका, मराठा बांधवांना शांततेचे आवाहन मनोर जरांगे पाटील यांनी केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी