33 C
Mumbai
Monday, April 22, 2024
Homeमहाराष्ट्रमधुबन कॉलनी येथे राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर जीव घेणा हल्ला

मधुबन कॉलनी येथे राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर जीव घेणा हल्ला

पंचवटी परिसरातील मधुबन कॉलनी येथे राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यावर मागील भांडणाची कुरापत काढून एका टोळक्याने जीव घेणा हल्ला केल्याची घटना बुधवारी घडली होती. या घटनेतील सहा संशयितांविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक दिनेश खैरनार करीत आहे.फिर्यादी रोहन रामप्रसाद कातकाडे, ३२, रा. सागरकुंज अपार्टमेंट, राजपाल कॉलनी, मखमलाबाद नाका, पंचवटी हे मंगळवार दि. ३० रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास मधुबन कॉलनी येथील इच्छापूर्ती गणेश मंदिरातून दर्शन घेऊन बाहेर आले असता. संशयित रोशन अहिरे आणि वंदन अहिरे यांनी काय रे तू रात्री काय म्हणत होता असे म्हणून लोखंडी रोडने रोहन याला मारहाण करण्यास सुरुवात केली.

याचवेळी संशयित रोहित परदेशी, राज प्रल्हाद मदोरिया उर्फ प्रिन्स, बाळा देशमुख आणि साहिल (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) यांनी देखील लोखंडी रोडने आणि दगडाने रोहनवर प्राणघातक हल्ला चढविला.
या प्राणघातक हल्ल्यामध्ये रोहन कातकाडे यांच्या डोक्यात लोखंडी रॉड लागल्याने गंभीर जखमी झाला आहे. तसेच, इतर संशयितांनी केलेल्या हल्ल्यामध्ये दोन्ही पायांचे गुडघे व घोटे यांचा अक्षरशः चुरा झाला असून, डाव्या पायाचे हाड देखील मोडले आहे. सध्या रोहन याच्यावर एका खासगी रुग्नालयात उपचार सुरु आहे. या प्राणघातक हल्ल्याबाबत संशयित रोशन अहिरे, वंदन अहिरे, रोहित परदेशी, राज प्रल्हाद मदोरिया उर्फ प्रिन्स, बाळा देशमुख आणि साहिल यांच्याविरोधात पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व संशयित फरार झाले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी